Shweta Tiwari Life Unknown Facts Instagram
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Shweta Tiwari: दोन लग्न करूनही जगतेय एकटी!; श्वेता तिवारीचा प्रेरणादायी प्रवास...

Shweta Tiwari Birthday News: श्वेताने एक उत्तम अभिनेत्री होण्यासाठी आपल्या आयुष्यात फार स्ट्रगल केले आहे. रिल लाईफ प्रमाणे श्वेताची रियल लाईफ सर्वाधिक चर्चेत आहे.

Chetan Bodke

Shweta Tiwari Life Unknown Facts

श्वेता तिवारीला टेलिव्हिजन क्षेत्रात आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. श्वेता तिवारी आज ४३वा वाढदिवस साजरा करते. श्वेताने तिच्या सिनेकारकिर्दित टेलिव्हिजन मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. श्वेताने एक उत्तम अभिनेत्री होण्यासाठी आपल्या आयुष्यात फार स्ट्रगल केले आहे. तिची रिल लाईफ जितकी चर्चेत होती, त्याहून अधिक रियल लाईफ तिची चर्चेत होती. अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने आपल्या आयुष्यात फार संघर्ष केला आहे.

आज श्वेता तिवारीचा वाढदिवस. श्वेता आज तिच्या फॅमिलीसोबत ४३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. श्वेताने आपल्या जॉबची सुरुवात वयाच्या १२ व्या वर्षापासून केली. तिने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आपला पहिला जॉब केला होता. त्यावेळी तिचा पगार फक्त ५०० रुपये इतका होता. पण तिला अभिनेत्री व्हायचे आहे, हे स्वप्न उराशी बाळगत तिने आपल्या आयुष्यात मोठा स्ट्रगल केला. ती लहान असल्यापासून स्वतःची आर्थिक जबाबदारी तिने स्वतःच घेतली होती.

पहिल्या जॉबमधून मिळत असलेल्या पगारातून श्वेताने आपल्या शाळेची फी भरली होती. त्यासोबतच श्वेता आपला इतर खर्च सुद्धा त्या पगारातून करायची. तिने इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे तिचे कायमच चाहत्यांकडून कौतुक होते. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. ही मालिका २००१ मध्ये स्टार प्लस या चॅनलवर टेलिकास्ट होत होती. या मालिकेत तिने प्रेरणा शर्मा नावाचे पात्र साकारले होते. (Actress)

श्वेता तिवारीने आपल्या खासगी आयुष्यात दोन लग्न केले होते. तिने पहिले लग्न राजा चौधरीसोबत केले होते. लग्नानंतर काही वर्ष दोघे एकत्र गुण्यागोविंदाने राहिले. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात वाद व्हायला लागला. १४ वर्ष दोघांनीही एकत्रित संसार केला होता. श्वेताने पती राजा चौधरीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

श्वेताने २०१३ मध्ये अभिनवसोबत दुसरं लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर तिने दुसऱ्या पती विरोधातही कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याला त्या प्रकरणी पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. दरम्यान, अभिनेत्री दोन लग्न करुन सुद्धा तिच्या खासगी आयुष्यात एकटी राहते. असं असलं तरी, श्वेता आपल्या मुलांसोबत वेगळी राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT