‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभासच्या प्रसिद्धीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्याच्या अभिनयाचा चाहतावर्ग फक्त दक्षिण भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात तयार झाले. प्रभास आज अर्थात २३ ऑक्टोबर रोजी आपल्या फॅमिलीसोबत आणि फॅन्ससोबत ४४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या प्रभासचा चेन्नईमध्ये जन्म झाला. प्रभासला ‘बाहुबली’मुळे प्रचंड मोठा चाहतावर्ग मिळाला.
रील लाइफमध्ये खूप रोमँटिक आणि तितकाच अँग्री असलेला प्रभास रियल लाईफमध्ये फार वेगळा आहे. खरंतर बालपणापासून अभिनयाची पार्श्वभूमी असली तरी, प्रभासला अभिनयामध्ये काहीच रस नव्हता. पण तरीही अभिनयक्षेत्रात कसा आला? याची माहिती फार कोणाला माहित नाही.
(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते उप्पलापती सुर्या नारायण राजू असं प्रभासच्या वडीलांचं नाव. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती. प्रभासला बालपणापासूनच अभिनयाची पार्श्वभूमी मिळाली असली तरी त्याला अभिनयाची आवड नव्हती.
प्रभासने आतापर्यंत अभिनय केलेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक महत्वाचे रेकॉर्ड मोडत, आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रभास खरंतर खवय्ये शौकीन आहे. त्यामुळे त्याला स्वत:च्या मालकीचे हॉटेल उघडायचे होते.
खवय्ये शौकीन असलेला प्रभास अभिनेता कसा झाला? हा रंजक प्रवास अनेकांना माहित नाही. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासचे काका एका चित्रपटाची निर्मिती करत होते. त्या चित्रपटामध्ये प्रभाससोबत मिळतं जुळतं एक पात्र होतं. त्याला त्या चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी त्याच्या काकांनी तयार केले. २००० मध्ये प्रभासने 'ईश्वर'चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलं. पण त्याच्या पहिल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खास कमाई करता आली नाही.
कायमच अभिनयामध्ये अव्वल ठरलेल्या प्रभासने जाहिरातींमध्ये जास्त काम केले नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्याने आतापर्यंत अनेक कोट्यवधींच्या जाहिरातीच्या ऑफर धुडकावून लावलेल्या आहेत. त्याने आतापर्यंत फक्त TUV 300 या महिंद्राच्या जाहिरातीतच काम केले होते. प्रभासला त्याचे चाहते प्रेमाने 'डार्लिंग प्रभास' म्हणतात. तर ४४ वर्षीय अभिनेत्याने आतापर्यंत ६००० हून अधिक मुलींना लग्नांसाठी नकार दर्शवला आहे.
बाहुबली 2: द कन्क्लुजन - 8.2
बाहुबली: द बीगिनिंग - 8.0
छत्रपती - 7.6
डार्लिंग - 7.4
मिरची - 7.3
वर्शम् - 7.1
मिस्टर परफेक्ट -7.0
बुज्जीगाडू: चेन्नईमध्ये बनवलेले – 6.3
चक्रम – 6.1
बिल्ला – 6.1
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.