Kiran Mane Shared Naseeruddin Shah Birthday Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naseeruddin Shah Birthday : नसीरूद्दीन शहांना कोणी घडवलं ? किरण मानेनी वाढदिवसानिमित्त सांगितला जबरदस्त किस्सा...

Kiran Mane Shared Naseeruddin Shah Birthday Post : नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते किरण मानेने खास इन्स्टा पोस्ट शेअर करत नसीरूद्दीन यांच्या करियरच्या काळाबद्दल लिहिलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज (२० जुलै) ७४ वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म एका नवाब कुटुंबात झाला. नसीरूद्दीन यांनी मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते किरण मानेने एक खास इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नसीरूद्दीन यांच्या करियरच्या काळाबद्दल लिहिलं आहे.

नसीरूद्दीन शाह यांच्याबद्दल किरण मानेनी पोस्टमध्ये लिहिलं की, "पन्नास वर्ष उलटून गेली या गोष्टीला! अजमेरचं एक वांड पोरगं. पिच्चरचं लै याड. घरातनं पळून मुंबईला आलं 'हिरो' बनायला. आईबाप टेन्शनमध्ये. लै शोधला. पत्ताच लागंना. पोराच्या बापाकडं अजमेरच्या दर्ग्याचं व्यवस्थापन होतं. अभिनेते दिलीपकुमार यांची बहिण सकीना आपा आणि सईदा या दोघींचं अजमेरला सारखं येणंजाणं असायचं. 'पोरगं नक्की सिनेमाच्या वेडापायी मुंबईला गेलं असणार' या अंदाजानं त्यांनी फोन करून सकीना आणि सईदा यांच्या कानावर ही गोष्ट घातली. सईदानं मुंबईचं पोलीस खातं कामाला लावून त्या पोराला शोधून काढलं."

"सईदानं त्याला गाडीत बसवलं आणि थेट पाली हिलच्या दिलीपकुमारजींच्या बंगल्यावर घेऊन आली. गेस्ट रूममध्ये त्याची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली. पोरगं भिरीभिरी नजरेनं दिलीपकुमारला शोधायला लागलं. पण अजून दिलीपकुमार दिसला नव्हता. ते शुटिंगसाठी बाहेरगावी होते. हॉलमध् सहा-सात 'फिल्मफेअर'च्या ट्रॉफीज बघून पोरगं परत 'येडं' झालं ! ट्रॉफी हातात घेऊन ॲवॉर्ड मिळाल्याचं नाटक करायला लागलं. खोटंखोटं हृदयस्पर्शी भाषण करून झालं! दुसर्‍या दिवशी पोरानं सहज खिडकीतनं बाहेर बघितलं तर थेट दिलीपकुमार दिसले! दिलीपकुमार बागेत एकटे फिरत होते. आता यांना गाठून थेट पायच धरायचे."

" 'काहीही करा पण मला सिनेमात काम मिळवून द्या. मी परत अजमेरला जाणार नाही, इथंच राहणार तुमच्याकडं.' म्हणायचं. पोरगं दबकत-दबकत त्यांच्याजवळ गेलं.. दिलीपकुमार यांनी त्याला बघितलं आणि त्या पोरानं तोंड उघडेपर्यंत दिलीप यांनी 'लेक्चर' झाडलं! लै चिडले होते "सिनेमात काम करणं सोपं नाही. लहान मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करावं. असली भलती स्वप्नं बघू नयेत. हे मायाजाल आहे." वगैरे वगैरे लै बोलले... पोरगं काय बोलायच्या आत 'विषय संपला' असा हात केला आणि 'चल जा इथून. रूममध्ये बस.' असा इशारा केला. दुसर्‍या दिवशी डेहराडून एक्सप्रेसमधून त्याला घरी, अजमेरला पाठवण्यात आलं... आज तो पोरगा 'महान अभिनेता' म्हणून ओळखला जातो... त्याचं नाव- 'नसीरूद्दीन शाह' !"

"योगायोग म्हणजे नंतर नसीरूद्दीन यांनी दिलीपजींसोबत काम करायची संधीही मिळाली... पण लहानपणीच्या 'त्या' भेटीबद्दल बोलायचं धाडस मात्र नाही झालं नसीरूद्दीन यांचं. नंतरच्या काळात, आजपर्यंत छोट्या गावांमधनं मुंबईला येऊन अभिनयक्षेत्रात काहीतरी 'जगात भारी' करून दाखवण्याची स्वप्नं बघणार्‍या... सामान्य चेहर्‍याच्या मनोज बाजपेयी, इरफान,नवाज,अतुल कुलकर्णी,संजय मिश्रा यांच्यासह सगळ्या 'स्मॉल टाऊन बॉईज'साठी कायम 'प्रेरणा' ठरणार्‍या नसीरभाईंचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नसीर भाई ! "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी काम, सहा महिने थांब... शिक्का पुसला जाणार, KDMC मध्ये राज्यातील पहिला प्रयोग, १५ ऑगस्टपासून सुरू

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले; १० तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Dnyanda Ramatirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरची पहिली मालिका कोणती?

गुगल मॅपने पुन्हा गंडवलं, कार थेट खाडीत कोसळली, नवी मुंबईतील घटना

Saiyaara Box Office Collection : अहान पांडेच्या 'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार २०० कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT