Hanuman Ansh Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hanuman Ansh: २ कोटींच्या चित्रपटाने कमावले १०० कोटी! बॉक्स ऑफिसवर ६,००० टक्के नफ्याचा नवा रेकॉर्ड; 'टॉक्सिक'ला चारली धूळ

Hanuman Ansh Collection: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला.

Shruti Vilas Kadam

Hanuman Ansh Collection: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे मोठे यश मिळवले आहे. अवघ्या २ कोटी रुपये बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्तचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे २०२६ मधील सर्वात मोठ्या ‘स्लीपर हिट्स’पैकी हा एक चित्रपट ठरला आहे.

२ कोटींच्या बजेटमध्ये १२२ कोटींची कमाई

‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या ३१व्या दिवशी ‘हनुमान अंश’ने २२.७५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. यासह भारतातील चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन १४४.४० कोटी रुपये, तर नेट कलेक्शन १२२.१३ कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच चित्रपटाने प्रोडक्शन खर्चाच्या जवळपास ५० पट अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, १०० कोटींचा टप्पा गाठणारा सर्वात कमी बजेटचा हिंदी चित्रपट म्हणून ‘हनुमान अंश’ने नवा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘द काश्मीर फाइल्स’च्या नावावर होता.

सुरुवात संथ, नंतर मिळाली लोकप्रियता

प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, दोन आठवड्यांनंतर प्रेक्षकांच्या चर्चेमुळे आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘टॉक्सिक’ आणि ‘मिर्झापूर’सारख्या चर्चेत असलेल्या चित्रपटांमध्येही ‘हनुमान अंश’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता ११ सप्टेंबर रोजी ‘हनुमान अंश’ जगभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या सिक्वेलचीही घोषणा करण्यात आली आहे.

कोण होते नीम करोली बाबा?

नीम करोली बाबा हे हिंदू आध्यात्मिक गुरू आणि भगवान हनुमानाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचे जन्मनाव लक्ष्मण नारायण शर्मा असल्याचे सांगितले जाते. त्यांचा जन्म सुमारे १९०० मध्ये उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे झाला. ११ सप्टेंबर १९७३ रोजी वृंदावन येथे त्यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT