Director Hansal Mehta  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hansal Mehta: टोरंटोमध्ये 'गांधी' वेब सिरिजच्या प्रदर्शनापूर्वी हंसल मेहता यांना मोठा धक्का, सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हणाले...

Director Hansal Mehta: चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता पेचप्रसंगात अडकलेले दिसत आहेत. चित्रपट निर्मात्याची 'गांधी' ही वेब सिरीज टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवली जाणार आहे पण त्यांना अद्याप कॅनडाचा व्हिसा मिळालेला नाही.

Shruti Vilas Kadam

Director Hansal Mehta: चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी अनेक मोठे चित्रपट बनवले आहेत आणि जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आता त्यांची गांधी ही वेब सिरिज टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणार आहे. पण, गांधी वेब सिरिजच्या प्रीमियरसाठी आता फक्त १० दिवस शिल्लक असतानाही त्यांना कॅनेडियन व्हिसा अद्याप आलेला नाही. त्यामुळे, दिग्दर्शकाने सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे.

हंसल मेहता यांनी लिहिले, दिल्लीतील कॅनेडियन उच्चायुक्तालयाकडून मला व्हिसा मिळविण्यात कोणी मदत करू शकेल का? आम्ही TIFF2025 च्या जागतिक प्रीमियरपासून फक्त १० दिवस दूर आहोत आणि अद्याप व्हिसाचे कोणतेही चिन्ह नाही. आमचे पासपोर्ट पाठवून ३ आठवडे झाले आहेत. हंसल यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हंसल मेहता या मोठ्या कार्यक्रमाचा भाग होऊ इच्छितात परंतु आतापर्यंत त्यांच्या टोरंटोला जाण्याबाबत शंका आहे.

प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत

गांधी वेब सिरिजबद्दल बोलायचे झाले तर, या वेब सिरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी याने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय अमर उपाध्याय, टॉम फेल्टन, भामिनी ओझा आणि मॉली राईट आदि कलाकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये तो महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसला आहे. ही मालिका गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आली आहे. अ‍ॅपलॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार ही सिरिज तयार करण्यात आली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणारी ही भारतातील पहिली वेब सिरिज आहे.

टोरंटो आंतरराष्ट्रीय महोत्सव कधी सुरू होत आहे?

हंसल यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली आणि लिहिले, गांधीचा वल्ड प्रीमियर २०२५ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्राइम टाइम स्लेटमध्ये ठेवण्यात आला आहे. TIFF मध्ये प्रदर्शित होणारी ही इतिहासातील भारतातील पहिली वेब सिरिज आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल बोलायचे झाले तर, हा महोत्सव ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikona Fort History: महाराष्ट्राचा त्रिकोणी रत्न! तिकोना किल्ल्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि ट्रेकिंग अनुभव जाणून घ्या

Maharashtra Live News Update: विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी संबंध नाही लक्ष्मण हाकेंची जहरी टीका

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT