ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांच्या अनेक समस्या या आता हळू हळू सामान्य होऊ लागल्या आहेत. केस गळणे, कोंडा होणे, आणि केसांची वाढ थांबणे इ. या सगळ्यांवर उपाय म्हणून तुम्ही नैसर्गिक घटकांपासून बनवलेला हेअर पॅक घरच्या घरी बनवून लावू शकता. घरगुती गोष्टी वापरून हेयर पॅक कसा बनवावा ते जाणून घ्या.
नारळ तेल हे केसांना पोषण देते आणि स्कॅल्पला मॉइश्चराइज करते.
एरंडेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
स्कॅल्पवर होणारी जळजळ कमी करतो आणि केसांना चमकदार बनवतो.
केसांना दही लावल्यास स्कॅल्पवर होणारे इनफेक्शन रोखण्यास मदत करते आणि केस मऊ करते.
केसांवर मेथीदाणा लावल्यास केस गळणे थांबते आणि नवीन केस येण्यास सुरुवात होते.
सर्व घटक एकत्र करून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ते तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांच्या लांबीवर लावा आणि पेस्ट सुकल्यानंतर केस धुवून टाका.
हि पेस्ट केसांना लावल्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल, तसेच केसांची वाढ सुधारेल आणि केस चमकदार दिसतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.