Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : 'जयश्री आय लव्ह यू...' बिग बॉसच्या घरात सदावर्तेंनी सांगितली आपली प्यारवाली लव्हस्टोरी

Gunratan Sadavarte : बिग बॉसच्या घरात फक्त गुणरत्न सदावर्तेंची चर्चा पाहायला मिळत आहे. आता सदावर्तेंनी स्वतः आपल्या 'प्रेमाची गोष्ट' सांगितली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 ) पर्व एका आठवड्यातच सर्वत्र गाजत आहे. घरातील सदस्यांनी घरात धुमाकूळ घातला आहे. गुणरत्न सदावर्तेंचा (Gunratan Sadavarte ) घरात अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात आपल्या बायकोला खूप मिस करत आहे. त्यांना पत्नी जयश्री यांची खूप आठवण येत आहे. त्यांनी नुकताच आपल्या पत्नीची आठवण काढून त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.

बिग बॉसच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गुणरत्न सदावर्ते हे आपल्या बायकोसाठीचं प्रेम व्यक्त करत आहेत. ते म्हणतात की, एमएचं शिक्षण घेत असताना आम्ही दोघ एकमेकांवर प्रेम करत होतो. आम्ही एकत्र अजिंठा वेरुळची लेणी फिरलो आहोत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात फिरताना मला आमच्या जुन्या अनेक गोष्टी आठवतात. आम्ही सुट्टीच्या खोट सांगून फिरायला जायचो. तिच्या गाडीवर तिला घट्ट पकडून बसायचो आणि आम्ही दोघ खूप मज्जा करायचो.

गुणरत्न सदावर्ते हे आपली लव्हस्टोरी सांगताना शिल्पा शिरोडकर यांनी विचारले की, "तुमचं लग्न किती वर्षांपूर्वी झालं?" यावर सदावर्ते यांनी उत्तर दिलं की, "1997-1998 मध्ये प्रेम झालं आणि 2007 साली आम्ही लग्न केलं. मला दोन मुलं आहेत. मला फक्त जयश्री आवडते. तिला सोडून दुसरं कोणी चांगल वाटत नाही. आम्ही खूप फिरतो आणि भांडतो सुद्धा. ती तर मला खूप मारते पण तरीही मला त्याचं वाईट वाटत नाही. जयश्री माझ्यासारखी डॅशिंग आहे. मारामारी, जेल सगळं करते. मी फक्त तिच्यावर प्रेम करतो" असे बोलून सदावर्ते हे उठून जोरात बोलतात की, "जयश्री आय लव्ह यू." गुणरत्न सदावर्ते हे पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT