Dharmesh Parmar Death News Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमारचे निधन; चाहत्यांना बसला धक्का

वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्याचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गली बॉय फेम रॅपर धर्मेश परमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्याचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गली बॉयचा लीड हिरो रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी MC Demolition या नावाने प्रसिद्ध असलेल्या धर्मेशला सोशल (Social Media) मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मेशच्या निधनाने दोन्ही कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

हे देखील पहा -

रॅपर एमसी डिमॉलिशनच्या मृत्यूची पुष्टी त्याच्या स्वदेशी बँडने सोशल मीडियावर केली आहे. त्यांच्या शेवटच्या कामगिरीचा व्हिडिओ देखील बँडने सोशल मीडियावर शेअर केला आहे.गली बॉय मधील इंडिया 91 या गाण्याला धर्मेश परमारने आपला आवाज दिला आहे. धर्मेशने या गाण्याद्वारे लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.

धर्मेश परमार मुंबईतील एका चाळीत राहत होता आणि येथूनच त्याने रॅप बनण्यास सुरुवात केली. लोक त्याला क्रांतिकारी रॅपर या नावानेही ओळखत होते. धर्मेश परमार सुरुवातीपासून राजीव दीक्षित यांना आपला आदर्श मानत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ट्विस्ट! गुलाल उधळला पण निकाल कोर्टात, सोलापूरनंतर धुळ्यातील विजयाने भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये ताराच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका

Men's Day: 'होय पुरूषही रडतात...', बोरिवली स्टेशनवर ढसाढसा रडणारा तो तरुण कोण? VIDEO ची होतेय चर्चा

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT