Paresh Rawal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal : अभिनेते परेश रावल यांना मागावी लागली माफी, ही वेळ त्यांच्यावर का आली?

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान परेश रावल भाजपासाठी प्रचार करत होते, जिथे त्यांनी तेथील नागरिकांना संबोधित केले होते.

Chetan Bodke

Paresh Rawal : अभिनेते परेश रावल आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्या सर्वत्र गुजरात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. सध्या परेश रावल यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान परेश रावल भाजपासाठी प्रचार करत होते, जिथे त्यांनी तेथील नागरिकांना संबोधित केले होते. दरम्यान, परेश रावल यांनी रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख करताना हे वक्तव्य केले असून, त्यावरून वाद सुरू झाला आहे.

गुजरातमध्ये काय म्हणाले परेश रावल?

गुजरातच्या वलसाडमध्ये परेश रावल यांनी गुजराती भाषेतच जनतेला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी महागड्या गॅस सिलेंडरची मागणी आणि रोजगाराच्या मागणीबाबत सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परेश रावल म्हणाले, "गॅस सिलिंडर महाग आहेत पण स्वस्त होतील.

लोकांना रोजगारही मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागतील तेव्हा काय होईल. हे दिल्लीत होत आहे. मग तेव्हा तुम्ही गॅस सिलिंडरचे काय करणार? बंगाली लोक मासे कसे शिजवणार?"

यावेळी परेश रावल गुजरातचा उल्लेख करताना म्हणाले की, गुजरातची जनता महागाई सहन करू शकते पण या गोष्टींना नाही झेलू शकत. विरोधकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, ते ज्याप्रकारे शिवीगाळ करतात, त्यापैकी एकाच्या तोंडावर डायपर बांधण्याची गरज आहे. परेश रावल यांच्या या वक्तव्यावरून आता जोरदार वाद सुरू झाला असून विरोधी पक्षनेते त्यांच्यावर टीका करत आहेत.

परेश रावल यांचा हा व्हिडिओ शेअर करताना तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ट्विटरवर लिहिले, बाबूभाई तुम्ही तर असे नव्हते. जर बांगलादेशी आणि रोहिंग्या भारतात घुसत आहेत, तर याचा अर्थ ते गृहमंत्री म्हणून त्यांचे काम चोखपणे करू शकत नाहीत.बीएसएफ सीमेवर नीट संरक्षण करू शकत नाही असे म्हणत आहात का?

सध्या परेश रावल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि परेश रावल यांच्यावर बंगाली आणि बांगलादेशी लोकांविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप करत आहेत. काही लोकांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे. याबाबत परेश रावल यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT