Vedat Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चांगलाच चर्चेत आहे, अनेकदा ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर अखेर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक तगड्या कलाकारांची फौज दिसणार आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेक कारणावरुन चित्रपटाला ट्रोल केले जात आहे, अक्षय कुमारला नेटकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यानंतर त्याला ट्रोल केले होते. सोबतच महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर याने देखील या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण त्याची भूमिका नेटकऱ्यांना पसंदीस न आल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
अलिकडेच सिनेमाच्या सेटवर झालेला अपघात आणि लगेच नंतर टीमचं कोल्हापूरात ज्योतिबा दर्शन आणि जमिनीवर बसून जेवणाच्या पंगतीचा आनंद घेणं एक ना अनेक कारणांनी सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या टीमनं केलेलं हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आले आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाची टीम सध्या कोल्हापुरात शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगमध्ये व्यग्र असणाऱ्या या टीमने आज मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवाचं सेलिब्रेशन कोल्हापुरातूनच केले आहे.
सध्या त्यांचे हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी एक हटके फोटोशूट केले. हा फोटो शेअर करत त्यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आडवा होई पर्यन्त व्यायाम करून साजरा केला पाडवा’ हटक्या पद्धतीने पाडवा साजरा करणाऱ्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या टीमचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले असून चाहत्यांचे मन वेधून घेतले आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमातील अभिनेता विराट मडकेनं हे फोटो गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, विशाल निकम, विराट मडके, जय दुधाने, डॉ.उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, प्रविण तरडे, आरोह वेलणकर असे कलाकार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.