Govinda's Wife Sunita Ahuja Get Trolled
Govinda's Wife Sunita Ahuja Get Trolled @officialsunitaahuja
मनोरंजन बातम्या

Govinda's Wife Sunita Ahuja Get Trolled: महाकाल मंदिरात जाताना गोविंदाच्या पत्नीकडून मोठी चूक, ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुनिता

Pooja Dange

Sunita Ahuja-Govinda At Mahakal Temple: बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. गोविंदाने त्याच्या पत्नीसह उज्जैनमधील महाकाल मंदिराला भेट दिली आणि पूजा केली.

महाकालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या नजरा सुनीता आहुजाच्या पर्सकडे गेल्या. सुनीता पर्स घेऊन मंदिरात गेली होती, परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात पर्स नेण्यास मनाई आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाकालच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Latest Entertainment News)

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही नेटिझन्सच्या निशाण्यावर आले आहेत. हे घडल्यानंतर मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष का दिले नाही, याविषयी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून का रोखले नाही? व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सुनीता आहुजाच्या हातात पर्स आहे आणि तिच्या जवळ पुजारीही आहेत.

सुनीता आहुजानेही हे फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटोमध्ये तिच्या खांद्यावर हिरव्या रंगाची हॅन्ड बॅग दिसत आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, 'उज्जैनच्या महाकाल मंदिरात सुंदर दर्शन घेतले'.

आता मंदिराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुनीता आहुजा मंदिरात प्रवेश करत असताना मुख्य गेटवर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. ही चूक करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर कारवाई केली जाईल, असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

SCROLL FOR NEXT