Kiran Mane On Trimbakeshwar Dispute
Kiran Mane On Trimbakeshwar DisputeInstagram @kiranmane7777

Kiran Mane Post: 'आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं...' किरण माने यांची रोखठोक प्रतिक्रिया

Kiran Mane's Reaction: अभिनेते किरण माने यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane On Hindu-Muslim Relation: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्माच्या जमावाकडून बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण तापले आहे. मंदिरासमोर धूप दाखवल्याने या वादाला सुरुवात झाली आहे. तर ही गावाची परंपरा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याच प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी त्यांचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'वारी' ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच 'टाईमपास' म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाय. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. (Latest Entertainment News)

Kiran Mane On Trimbakeshwar Dispute
Hansika Motwani On Hormonal Injection: दोन वर्षात बालकलाकार नायिका कशी झाली? हार्मोनल इंजेक्शनवर हंसिका मोटवानीचा खुलासा

...याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबत्यात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करत्यात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजत्यात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.

...विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही 'अदा' होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेत्यात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करत्यात!! एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी 'मेसेज' द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.

ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला 'भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला... तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर 'आपलंच' डोकं हाय... - किरण माने. (Actor)

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेली घटना

गुलाब शाहवली बाबा संदल मिरवणुकीदरम्यान शनिवारी मुस्लिम समुदायातील काही युवक त्र्यंबकेश्वराला धूप दाखविण्यासाठी उत्तर प्रवेशद्वाराजवळ गेले होते. देवाला धूप दाखविण्यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ही प्रथा जुनी असून, आम्हाला दर वर्षी आत सोडले जाते, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, मंदिरात हिंदूंनाच प्रवेश असल्याचे सांगून सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. या वेळी उपस्थित काही भाविकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. त्यानंतर अफवा पसरू लागल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com