Govinda and Sunita Ahuja together saam tv
मनोरंजन बातम्या

Govinda sunita divorce : गोविंदा फक्त माझा आहे, वरून देव आला तरी...; घटस्फोटाच्या चर्चांवर पत्नी सुनीताची प्रतिक्रिया

Govinda-Sunita Divorce Buzz : अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. या वृत्ताचं पत्नी सुनीता अहुजा हिनं खंडन केलंय. आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही, असं तिनं ठणकावून सांगितलंय.

Nandkumar Joshi

  • घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाची पत्नी सुनीताची प्रतिक्रिया

  • गोविंदा फक्त माझा आहे, कुणीही आम्हाला वेगळं करू शकत नाही

  • वरून देव आला तरी आम्हाला वेगळं करू शकत नाही -सुनीता

एरवी कुठल्याही वादापासून दूर असलेला अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच काय तर सुनीता अहुजानं घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय इथपर्यंत ही चर्चा पोहोचलीय. त्यावर आता स्वतः सुनीतानं प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आम्हाला दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. वरून देव किंवा सैतान आला तरी आम्हाला एकमेकांपासून दूर केलं जाऊ शकत नाही, असं सुनीतानं सांगितलं.

काय म्हणाली गोविंदाची पत्नी?

गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. गणपतीचं आगमन घरोघरी झालंय. गोविंदा आणि सुनीताच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. यावेळी माध्यमांनी त्यांना घटस्फोटाच्या चर्चांवर विचारणा केली. त्यावर या चर्चांना तिनं पूर्णविराम दिलाय. आज आम्हाला सोबत बघून तसं वृत्त देणाऱ्यांना चपराक बसली आहे. जर तसं काही असतं तर आम्ही इतक्या जवळ असतो का? आमच्यात दुरावा असता, असं ती म्हणाली.

आम्हाला दोघांना कुणीही वेगळं करू शकणार नाही. वरून देव जरी आला तरी किंवा सैतान जरी आला तरी आम्हाला वेगळं करता येणं शक्य नाही. एका चित्रपटात डायलॉग होता, माझा नवरा फक्त माझा आहे, तसंच माझा गोविंदा फक्त माझा आहे. दुसऱ्या कुणाचाही नाही. आम्ही जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत कुणीही काही बोलू नका, अशी विनंतीही तिनं केलीय.

सर्वांनी गणेशाचं दर्शन घ्यावं. गणपती उत्सव साजरा करावा. श्री गणेशाच्या आशीर्वादानंच प्रत्येक नवं कार्य सुरू होतं. सर्वांनी आनंद घ्या, असंही ती म्हणाली.https://x.com/PTI_News/status/1960633993533251649

गोविंदा काय म्हणाला?

गणराया विराजमान झाल्यानंतर माध्यमांनी गोविंदाला अनेक प्रश्न विचारले. त्यावर गणपतीची कृपा होते तेव्हा कुटुंबाचं दुःख दूर होतं. अडचणी दूर होतात. मी एवढीच प्रार्थना करतो की आपण सर्व एकत्रित राहावं. माझ्या मुलांना सपोर्ट करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. लोकांना आश्चर्य वाटतं की माझी मुलं कोणत्याही सपोर्टशिवाय यशस्वी होत आहेत. जसं मी कुणाच्याही पाठिंब्याशिवाय बॉलिवूडमध्ये आलो तशी कृपा त्यांच्यावर राहू दे, असं सांगतानाच, घटस्फोटाच्या चर्चांवर बोलणं टाळलं. यावेळी घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारणा केली असता, सुनीतानं उत्तर दिलं. तुम्ही वाद ऐकायला आलात की गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलात, असं ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT