Govinda Wife Sunita Ahuja Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda: गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील दुरावा संपला; पण, सुनीता आहूजा अजूनही नाराज

Govinda Wife Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने अलीकडेच एका मुलाखतीत तिचा पती गोविंदा आणि अभिनेत्याचा पुतण्या कृष्णा अभिषेक यांच्यातील नात्याबद्दल भाष्य केले.

Shruti Vilas Kadam

Govinda Wife Sunita Ahuja: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील सात वर्षांपासूनचा दुरावा अलीकडेच संपुष्टात आला आहे. कृष्णाने गोविंदाच्या घरी भेट दिली आणि दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कृष्णा म्हणाला, "सात वर्षांनंतर मामा आणि नमो (टीना आहूजा) यांना भेटून खूप इमोशनल झालो होतो."

या भेटीदरम्यान कृष्णा सुनीता आहूजांला भेटू शकले नाहीत. त्यांने सांगितले की, "मामी व्यस्त होत्या, त्यामुळे भेट झाली नाही. तरीही, मला थोडी भीती वाटत होती कारण मामी मला ओरडतील असे वाटत होते." पण, सुनीता आहूजाने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, "मी गोविंदाला कधीही कृष्णाशी बोलण्यास मनाई केली नाही. तो त्याचा भाचा आहे. माझही त्याच्यावर प्रेम आहे.

कृष्णा अभिषेक यांनी सुनीता आहूजांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मामींनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे. त्यांना माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांची माफी मागण्यास तयार आहे."

या पार्श्वभूमीवर, गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील संबंध सुधारले असले तरी, सुनीता आहूजांची नाराजी अद्यापही कायम आहे. भविष्यात या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये पूर्ण सुसंवाद आणि सौहार्द निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT