Govinda On Affair Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda On Affair Rumours: तू लिमिटमध्ये राहा! गोविंदानं बायकोला दिली वॉर्निंग, रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ झाला होता व्हायरल

Govinda On Affair Rumours: गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहेत. सुनीताच्या ‘शुगर डॅडी’ वक्तव्यावर गोविंदाने संताप व्यक्त करत तिला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.

Shruti Vilas Kadam

Govinda On Affair Rumours: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या वर्षभरापासून विविध चर्चा सुरू आहेत. विशेषतः गोविंदाचे अफेअर सुरु असल्याच्या अफवांनी चांगलाच जोर धरला आहे. गोविंदाचे नाव एका तरुण अभिनेत्रीशी जोडले गेल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली. त्यातच सुनीता यांनी गोविंदाच्या अफेअरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चांना आणखी हवा मिळाली. आता या संपूर्ण प्रकरणावर गोविंदाने नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच गोविंदा विमानतळावर तरुण अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसला. यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली. गोविंदा आणि सुनीता यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्यांमुळे या व्हिडिओने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले. मात्र, गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सुनीताच्या वक्तव्यावर गोविंदाचा पलटवार

सुनीता आहुजा यांनी यापूर्वी गोविंदा आणि कोमल राणी यांच्याबद्दल पॅपराझींशी बोलताना गोविंदाचे नाव एका तरुण अभिनेत्रीशी जोडले जात असल्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी गोविंदाचा उल्लेख ‘शुगर डॅडी’ असा केला होता. सुनीतांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

आता गोविंदाने पत्नीच्या या वक्तव्यावर मौन सोडले आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये गोविंदा सुनीताच्या वक्तव्यावर नाराज असल्याचे दिसून आले.गोविंदा म्हणाला की, देशातील अनेक मोठ्या कलाकारांनी तरुण अभिनेत्रींसोबत काम केले आहे. लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी व्हावे, यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडली नाहीत आपल्या आयुष्यात प्रसिद्धी, आदर आणि संपत्ती ईश्वराच्या कृपेने मिळाले त्याचा गैरवापर करून इतरांचा अपमान करू नये, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. असेही स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

Ideal age gap in marriage: सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

जबरदस्त! रेल्वे घडवणार 'वनदर्शन', जंगल सफारी, IRCTC चं पर्यटन पॅकेज कसं मिळेल, कधीपासून होणार सुरू? वाचा

SCROLL FOR NEXT