Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Life Threat : सलमान खानला संपवणारच... गँगस्टर गोल्डी ब्रारची उघड धमकी

Gangster Goldy Brar : गेल्या काही महिन्यांत सलमान खानला अनेक धमकीचे कॉल आणि पत्रे आली आहेत.

Pooja Dange

Goldy Brar Gives Open Threat To Salman Khan : कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने एका टेलिव्हिजन मुलाखतीत म्हटले आहे की, 1998 मध्ये काळवीट मारून बिश्नोईंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली नाही तर तो बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ठार मारेल.

बिश्नोई समाजात काळवीट पवित्र मानली जाते. इंडिया टुडेला दिलेल्या एका खास मुलाखतीत गोल्डी ब्रार म्हणाला की, त्याने गायक सिद्धू मूसेवालाला मारले आणि तो सलमान खानला पण ठार मारेल.

वृत्तानुसार, गोल्डी ब्रार कॅनडाला पळून गेला आहे. गेल्या काही महिन्यांत सलमान खानला अनेक धमकीचे कॉल आणि पत्रे आल्याने मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवल्यानंतर आता पुन्हा सलमानला धमकी आली आहे. (Latest Entertainment News)

सलमान खानला मारणे हे त्याच्या जीवन ध्येय आहे असे गोल्डीने इंडिया टुडेला सांगितले, "भाई साहेब (लॉरेन्स बिश्नोई) ने त्याला माफी मागायला सांगितले होते. पण त्याने माफी मागणार नाही असे सांगितले. बाबा दया तेव्हाच दाखवतील जेव्हा त्यांना दया येईल."

"आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, हे फक्त सलमान खानबद्दल नाही. आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्या सर्व शत्रूंविरुद्ध आमचे प्रयत्न सुरूच ठेवू. सलमान खान आमचे लक्ष्य आहे, यात काही शंका नाही. आम्ही प्रयत्न करत राहू आणि आम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला कळेल," असे गोल्डी ब्रार म्हणाला आहे.

गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याची कबुली दिली आणि तो खूप अहंकारी असल्याने त्याला धडा शिकवण्याची गरज असल्याचे सांगितले. "सिद्धू मूसवाला एक अहंकारी व्यक्ती होता. त्याने आपल्या राजकीय आणि पैशाच्या शक्तीचा गैरवापर केला. त्याला धडा शिकवणे आवश्यक होते आणि त्याला तो धडा आम्ही शिकवला," गोल्डी ब्रारने सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भटिंडा तुरुंगात असलेले लॉरेन्स बिश्नोई यांनी तपासकर्त्यांना सांगितले की राजकारणी आणि व्यापारी त्याला धमक्यांसाठी फी देतात जेणेकरून ते पोलिसांकडे अतिरिक्त संरक्षण मागू शकतील.

लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वी एनआयएकडे कबुली दिली होती की सलमान खान त्याच्या प्रमुख लक्ष्यांपैकी एक होता.

"मला माहित आहे की जे घडायचे आहे ते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी घडेलच. माझा विश्वास आहे की (देवाचा उल्लेख करून) तो आहे. याचा अर्थ असा नाही की मी मुक्तपणे फिरू लागेन. आता माझ्या आजूबाजूला अनेक शेरा आहेत. माझ्यासोबत इतक्या बंदुका फिरत आहेत की आजकाल मी घाबरलो आहे," असे सलमान खान एप्रिलमध्ये धमकीचा फोन आल्यानंतर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

SCROLL FOR NEXT