Gautami Patil New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

Gautami Patil New Song: गौतमी पाटीलचं नवं गाणं राणी एक नंबर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला सोनाली सोनवणेनं आवाज दिला आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटील चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतच गौतमी पाटीलचं 'राणी एक नंबर' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. बॉलिवूड स्टाईलमध्ये या गाण्याची निर्मिती झाली असून गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला आवाज दिला आहे. रोहन साखरे यानं गाणं लिहलं आहे. कैलाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मिती झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं आहे.

गौतमी पाटील “राणी एक नंबर” गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “या गाण्याच्या नावातच “राणी एक नंबर” आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं एक नंबरच असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला या गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात. तसेच मी पिवोट म्यूजिकचे आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही माझ्या इतर गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम “राणी एक नंबर” या गाण्याला द्या. राणी एक नंबर या गाण्यावर तुमचे सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

https://yt.openinapp.co/c83y1

गायिका सोनाली सोनवणे “राणी एक नंबर” गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, राणी एक नंबर हे गाणं कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक मुलगी जेव्हा सेल्फ ऑब्सेसड आणि कॉन्फिडेंट आहे तर ती काय बोलेल याचा अभ्यास मी केला. आणि तशाच हरकती मी या गाण्यात घेतल्या आहेत. गाण्याची संपूर्ण टीम म्यूजिक स्टूडियोमध्ये उपस्थित होती. सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल. हे गाणं डान्सिकल आहे. त्यामुळे मी ते संपूर्ण एनर्जीने गाणं गायल आहे. मला गाणं गाताना खूप मज्जा आली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय ते पाहून फार आनंद होत आहे.”

संगीतकार मोहन उपासनी गाण्याविषयी सांगतात,” एक नंबर हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दाला घेवून हे गाण करायचं मी ठरवल. आणि मी जेव्हा कंपोझिशन करायला बसलो. तेव्हा हे कॉम्बिनेशन जुळून येत होत. अशी ही सर्व गाण्याची सुरुवातीची प्रोसेस होती. या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. पिवोट म्यूजिक सर्व प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम गाणी घेवून आणण्याचा प्रयत्न करेल. राणी एक नंबर हे गाणं सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापुरात संपत्तीच्या वादातून भावजयीसह मुला - मुलीची तलवारीने हत्या

परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

Team India T20 World cup : टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; कर्णधार कोण? कोणाला मिळाली संघात संधी?

Pune Tourism : पुण्याजवळील ऐतिहासिक रत्न, 'या' किल्ल्यावर सुरू झाला मराठा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

SCROLL FOR NEXT