Shreya Maskar
पुरंदर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, सासवड गावाजवळ नारायणपूर या गावी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत स्थित आहे. या किल्ल्यावरून मराठा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा सुरू झाला.
पश्चिम घाटातील पुरंदर किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,३७४ मीटर उंचीवर आहे. पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत नक्की जाऊ शकता.
पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. ऐतिहासिक पुरंदर किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या (Indian Army) अधिपत्याखाली आहे.
पुरंदर किल्ला हा एकाच डोंगरावर वसलेला दुमजली किल्ला आहे, जो त्याच्या लष्करी व मोक्याच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. याचे मुख्य दोन भाग म्हणजे खालील भागातील 'माची' आणि वरील भागातील 'बालेकिल्ला' (Upper Fort) होय.
११ जून १६६५ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्यात ऐतिहासिक 'पुरंदरचा तह' झाला. जयसिंगाने वेढा घातल्यानंतर आणि मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडल्यानंतर, स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना हा तह करणे भाग पडले.
पुणे स्टेशनला उतरल्यावर रिक्षा किंवा बसने सासवड जवळील नारायणपूर गावाच्या पायथ्याशी उतरा. तेथून पुढे ट्रेक करत तुम्ही गडावर पोहचाल.
पुण्याला गेल्यावर तेथील ऐतिहासिक ठिकाणांची नक्की सफर करा. यात शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, सिंहगड किल्ला आणि पाताळेश्वर लेणी यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.