Urmila Matondkar: 'रंगीला'ला ३० वर्षे! ५१ वर्षाच्या उर्मिलाने रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला रे' म्हणत केला जल्लोष

Urmila Matondkar viral Video: बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी तिने ‘रंगीला’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Urmila Matondkar viral Video
Urmila Matondkar viral VideoSaam Tv
Published On

Urmila Matondkar viral Video: बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटातील तिच्या आयकॉनिक गाण्यावर तिने नुकताच एक छोटासा डान्स व्हिडिओ शेअर केला. वयाच्या ५१ व्या वर्षीही तिचे डान्स मूव्ह आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.

उर्मिलाने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. निळ्या-पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये, हाय हील्स घालून तिने ‘रंगीला रे’मधील लोकप्रिय स्टेप पुन्हा एकदा सादर केली. गाण्याच्या सुरांवर तिच्या स्टेप्स आणि चेहऱ्यावरील आनंदी झलक पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

Urmila Matondkar viral Video
Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

या पोस्टसोबत उर्मिलाने भावनिक कॅप्शन लिहिले आहे. तिने रंगीला’ हा फक्त चित्रपट नव्हे, तर एक भावना असल्याचं नमूद केलं.तीव्र आनंद, आशा, स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, सौंदर्य, उत्साह, आपुलकी, कौतुक, प्रेम आणि इच्छा, संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा एक भव्य उत्सव! या चित्रपटातील प्रत्येक गाणे केवळ संगीत नाही तर नवरासाचा उत्सव आहे. श्रृंगार (प्रेम), हास्य (हशा), करुण (दु:ख), रौद्र (राग), वीर (धैर्य), भयानक (भय), बिभत्स (तिरस्कार), अद्भूत (आश्चर्य) आणि शांत (शांती). एक निष्पाप मुलगी रुपेरी पडद्यावर येते आणि प्रेक्षकांचे मन जिंकते. प्रेक्षकांना सौंदर्य, कविता, जीवन आणि प्रेमाच्या कालातीत प्रवासावर घेऊन जाते. रंगीलाला आजपासून तीस वर्ष पूर्ण झाली! तुमचे प्रेम माझ्या प्रवासाचे सर्वात मोठे आशीर्वाद राहिले आहे. हो जा रंगीला रे…

Urmila Matondkar viral Video
Amitabh Bachchan: 'तुला मराठी येत नाही…”, अमिताभ बच्चन यांची मराठी भाषेबद्दल खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, गुगल ट्रान्सलेट...

उर्मिलाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, "तुम्ही अजूनही ९० च्या दशकातील उर्मिलासारखीच दिसता," माझं तेव्हाही तुझ्यावर फार प्रेम होतं आताही फार प्रेम आहे. तसेच अनेकांनी तिला पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत परत यावं अशी विनंतीही केली. १९९५ मध्ये आलेला ‘रंगीला’ हा चित्रपट उर्मिला मातोंडकरच्या कारकिर्दीला नवं वळण देणारा चित्रपट ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com