Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Ashish Kapoor: बलात्कार प्रकरणातील आरोपी अभिनेता आशिष कपूरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याची पॉटेन्सी टेस्टही केली आहे.
Ashish Kapoor
Ashish Kapoor
Published On

Ashish Kapoor Potency Test: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आशिष कपूर सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता आशिष कपूरला नुकताच दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आता दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने या अभिनेत्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी त्याची पॉटेन्सी टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

खटला कसा सुरू झाला?

११ ऑगस्ट रोजी एका महिलेने दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत एका घरगुती पार्टीदरम्यान आशिष कपूरने वॉशरूममध्ये तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. सुरुवातीला नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आशिष कपूर, त्याचा एक मित्र, मित्राची पत्नी आणि दोन अज्ञात पुरुषांची नावेही समाविष्ट होती. या सर्वांनी मिळून तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा महिलेने केला होता. पण नंतर तिने तिचे म्हणणे बदलले आणि फक्त आशिष कपूरवर आरोप केले.

अभिनेता अटक

दिल्ली पोलिसांनी तांत्रिक ट्रॅकिंग आणि लोकेशन सर्व्हिलन्सद्वारे आशिष कपूरला पुण्यातून अटक केली. उत्तर दिल्लीचे डीसीपी राजा बांठिया यांनी अटकेची माहिती दिली. महिलेने असाही आरोप केला आहे की या घटनेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे, परंतु पोलिसांना आतापर्यंत कोणताही व्हिडिओ सापडलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त पीडिता आणि आशिष पार्टी दरम्यान एकत्र वॉशरूममध्ये गेल्याचे उघड झाले आहे.

पोटेंसी टेस्ट का केली जाते?

बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा आरोपी स्वतःला नपुंसक म्हणवून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिस आरोपीची पॉटेंसी टेस्ट करतात. आशिष कपूरच्या बाबतीतही असेच घडले. या चाचणीत, डॉक्टर इंजेक्शन देऊन रक्तप्रवाह तपासतात आणि आरोपी शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम आहे की नाही हे शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. हा रिपोर्ट केससाठी महत्वाचा असतो.

आशिष कपूर कोण आहे?

आशिष कपूर हा टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'देखा एक ख्वाब' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्यांनी 'कुर्बान', 'टेबल नंबर २१' आणि 'इंकार' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. गंभीर भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आशिषची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com