Shreya Maskar
पुण्यात प्रसिद्ध अभिनेता आशिष कपूरला अटक करण्यात आली. वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
आशीष कपूरचा जन्म दिल्लीमध्ये झाला असून तेथे त्याने मॉडेलिंग आणि थिएटरमध्ये काम केले.
मॉडेलिंगमुळे आशीष कपूर मुंबईत आला आणि अनेक मालिकांमध्ये झळकला.
टिव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आशिष कपूर इंटीरियर डिझायनर म्हणूनही काम करत होता.
'शशशश... कोई है' या टिव्ही शोमधून आशिष कपूर अभिनयात पदार्पण केले.
'ये रिश्ता क्या कहलाता'मुळे आशिष कपूरला खूप लोकप्रियता मिळाली.
आशिष कपूर याने 'टेबल नंबर 21','कुर्बान' या चित्रपटात काम केले आहे.
आशिष कपूरने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. उदा. देवों के देव… महादेव, देखा एक ख्वाब,सात फेरे, सरस्वतीचंद्र, ढाई किलो प्रेम