Gashmeer Mahajani New Role Instagram
मनोरंजन बातम्या

Gashmeer Mahajani New Role: “पुन्हा तोच प्रवास सुरू होतोय…”, गश्मीर पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत; व्हिडीओ शेअर करत दिली चाहत्यांना मोठी हिंट

Gashmeer Mahajani New Movie: गश्मीरने नुकताच त्याच्या आगामी भूमिकेविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

Chetan Bodke

Gashmeer Mahajani New Role

प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी सध्या कमालीचा चर्चेत आहे. वडीलांच्या निधनानंतर अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. टिकेचा धनी बनलेला गश्मीर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

गश्मीरने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेत्याने त्याच्या आगामी भूमिकेविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. पण त्याने आपल्या पोस्टमध्ये कोणते पात्र साकारणार आहे? आणि कोणत्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे? याची माहिती सांगितलेली नाही.

फार मोठ्या गॅपनंतर अभिनेता रूपेरी पडद्यावर दिसणार असल्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्टची तुफान चर्चा होतेय. गश्मीर सरसेनापती हंबीररावनंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक भुमिकेमध्ये प्रेक्षकांचे तो मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिले की, ‘पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच पुन्हा तोच प्रवास सुरु होतोय…’ सध्या अभिनेत्याचीही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला प्रतिक्रिया देत आगामी भूमिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. गश्मीरचा एक चाहता म्हणतो, “गश्मीर तुम्ही खुप मेहनती आणि अभ्यासू कलाकार आहात.हंबीरराव चित्रपटातून तुम्ही आपल्या अभिनयाने चित्रपट वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. तुम्ही वडिलांच्या निधनानंतर सर्व गोष्टी संयमाने हाताळून, एक मुलगा, एक वडील, एक पती, सर्व भूमिका व्यवस्थित निभावलीय. तुमच्या पुढील काळात तुम्ही खुप यशस्वी होणार या साठी खुप खुप शुभेच्छा,”

तर आणखी एक युजर म्हणतो, “पुन्हा एकदा स्वराज्याच्या धाकल्या धन्याला याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार”, तर आणखी एक युजर म्हणतो, “तु एक अप्रतिम कलाकार आहेस. आम्ही तुझ्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत. छत्रपति संभाजी आणि शिवाजी महाराजाच्या रोल मधे” तर आणखी एक युजर म्हणतो, “शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी अप्रतिम अभिनय”

दरम्यान अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, विशू, सरसेनापती हंबीरराव मध्ये अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली होती. 'सरसेनापती हंबीरराव' मध्ये गश्मीरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर अभिनेता कोणत्या ऐतिहासिक भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT