Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात गश्मीर महाजनीची एन्ट्री; निक्कीला पाहताच झाला घायाळ? पाहा VIDEO

Gashmeer Mahajani - Prajakta Mali : बिग बॉसच्या घरात आज मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. फुलवंतीचे कलाकर घरातील सदस्यांसोबत कल्ला करणार आहेत.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, फुलवंती चित्रपटाचे कलाकार घरात सदस्यांना भेटायला आले आहेत. ते सदस्यांसोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. या एपिसोडचे होस्टिंग निलेश साबळे करत आहेत. तुम्ही पाहू शकता की, सर्व मिळून 'भाषेच्या तालावर' हा खेळ खेळताना दिसत आहेत.

चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ करणारी फुलवंती म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) आणि अभिनेता गश्मीर महाजनी बिग बॉस घरात आले आहेत. लुडोवर डान्सच्या स्टाइल लिहिलेल्या असतात.

सदस्यांना लुडो फेकायचा आणि जी डान्स स्टाइल येणार त्यावर भन्नाट डान्स करायचा आहे. यात अभिजीत लुडो फेकतो. त्याला हिपहॉप डान्स स्टाइल येते. "मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए" या गाण्यावर अभिजीत आणि गश्मीर महाजनी तुफान डान्स करताना पाहायला मिळतात. या गेममध्ये ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सूरज देखील डान्स करताना व्हिडिओमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहे. शेवटी निक्की "पाहुणा आला का बाण..." म्हणतं गश्मीर महाजनीना घायाळ करते. तिच्या अदांनी सर्व वेडे होतात. तसेच हसू लागतात.

नुकताच गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) 'खतरों के खिलाडी' पाहायला मिळाला. तसेच प्राजक्ता नेहमीच आपल्या कामामुळे आणि सोंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. आजचा बिग बॉसचा एपिसोड मनोरंचा धमाका पाहायला मिळणार आहे. तसेच या आठवड्यात कोण बिग बॉसच्या शर्यतीमधून बाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCMC Card Update : राज्यातील महिलांना सरकारचं दिवाळी गिफ्ट, NCMC कार्डबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य

BDD Homes : बीडीडी चाळीतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; ५५७ कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

Soap Hacks : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर

Skin Care: चेहऱ्यावरील काळे डाग होतील कायमचे कमी! करा हे सोपे आणि फायदेशीर घरगुती उपाय, चेहरा होईल ग्लोईंग

SCROLL FOR NEXT