KKK 14 Fights : 'खतरों के खिलाडी'मध्ये राडा, गश्मीर महाजनी अन् शालिन यांच्यात हाणामारी, नेमकं झालं काय?

Gashmeer Mahajani Fights : 'खतरों के खिलाडी' भिडले : गश्मीर महाजनी शालिन भनोटवर का चिडला ? दोघांच्या वादाचं नेमकं कारण काय
gashmir and shalin fight.
gashmir and shalin fight.instagram
Published On
Summary

'खतरों के खिलाडी'हा शो जसा त्यांच्या थरारक सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. तसाच तो तिथल्या स्पर्धकांच्या हटके अंदाजासाठी आवर्जून पाहिला जातो.

Shalin and Gashmeer Fights : 'खतरों के खिलाडी' हा छोट्या पडद्यावरील बराच चर्चेत असलेला रिऑलिटी शो आहे. नेहमीच या शोमध्ये काहींना काही होत असतेच. कधी बाचाबाची तर कधी राडा... कधीकधी हाणामारीही होते. 'खतरों के खिलाडी' हा शो पहिल्या सिझनपासूनचं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत आलाय. त्याला कारण गश्मीर ठरलाय.

रिऑलिटी शो म्हटलं कि, भरभरून ड्रामा, सस्पेंस आणि वादही आलेच. 'खतरों के खिलाडी' मध्ये असणारे एकाहून एक रोमांचक आणि तितकेच आव्हानात्मक स्टंटस आणि टास्क हा प्रेक्षकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतात.

शोमध्ये रोहित शेट्टीच्या आव्हांनांना निर्भयपणे सामोरे जाण्यासाठी अनेक स्पर्धक तयार असतात. या शोमध्ये येऊन आपल्यातील भीतीला हद्दपार करण्याचा प्रयत्न इथले स्पर्धक करत असतात. पण 'खतरों के खिलाडी'हा शो जसा त्यांच्या थरारक सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. तसाच तो तिथल्या स्पर्धकांच्या हटके अंदाजासाठी आवर्जून पाहिला जातो. कधी महिला स्पर्धकांमधली भांडणे, वादावादी या शोमध्ये पाहायला मिळते. तर कधी स्पर्धक एकमेकांसोबत भिडतात.

gashmir and shalin fight.
Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

यंदाही 'खतरों के खिलाडी' मध्ये दोन तगडे स्पर्धक भिडलेत. मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी आणि शालिन भनोट यांच्यात एका स्टंटच्या दरम्यान गंभीर वाद निर्माण झाला. या दोघांच्या भांडणाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्टंट दरम्यान गश्मीर त्याच्या टिमच्या एका सदस्याच्या बोलण्यामुळे विचलित होतो. दोघांमध्ये धक्काबुक्की-बाचाबाची होते. याच दरम्यान शालिन भनोट तिथे येतो. गष्मीर शालिनला वादात न पडण्यास सांगतो. तर यावरुन शालिन त्याला उलटसुलट बोलला. या दोघांमधला वाद पाहून प्रेक्षकही चक्रावलेत. दोघांच्या वादावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. कोण चुकीचा कोण बरोबर, याची गणितं मांडली जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com