Ganapath Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ganapath Movie : टायगर श्रॉफच्या 'गणपथ'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; बिग बींचा चित्रपटातील लूक रिव्हील

Ganapath Trailer : टायगर श्रॉफच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'गणपथ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganapath Movie Trailer :

टायगर श्रॉफच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'गणपथ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धमाकेदार आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील टायगर श्रॉफ, क्रिती सेनन आणि अमिताभ बच्चन यांचा लूक रिव्हील झाला आहे. अडीच मिनिटांचा हा टीझर आहे. ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातील एक आवाज येतो. ज्यात 'एक दिवस असा योद्धा जन्माला येईल जो अमर असेल. जो गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भिंत मोडून काढेल, तो कधीच मरणार नाही तर तो मारेल' असं म्हणतात. त्यानंतर टायगर श्रॉफची एन्ट्री होते. काही वेळानंतर क्रिती सेननची धमाकेदार एन्ट्री होते.

ट्रेलरमध्ये क्रिती टायगर श्रॉफचा जीव वाचवते. त्याला सुरक्षित ठिकाणी नेते. त्यानंतर तो क्रितीला प्रपोज करतो. त्यावर क्रिती म्हणते, 'आपण एक दिवस आधी भेटलो होतो'. त्यानंतर टायगर म्हणतो, 'प्रेम व्हायला असा किती वेळ लागतो'. त्यानंतर त्यांच्यातील रोमान्स पाहायला मिळतो.

अमिताभ बच्चन यांचा लूक

यानंतर ट्रेलरमध्ये बिग बींची एन्ट्री होते. बिग बी एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पगडी, चष्मा आणि एक डोळा झाकलेला असा त्यांचा जबरदस्त लूक आहे. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ट्रेलरमध्ये शेवटी मारामारीचा सीन दाखवण्यात आला आहे. ज्यात काही गुंड क्रिती आणि टायगरला वेगळे करतात. आणि टायगरला बेदम मारहाण करतात. त्यानंतर टायगर एकदम नवीन रुपात पुन्हा एन्ट्री घेतो. 'गपपथ' म्हणून टायगरची एन्ट्री होते. जुन्या गुड्डूचा अध्याय संपूण आता गणपथचा अध्याय सुरु होतोय. असं टायगर म्हणतो. यानंतर क्रिती सेननही अॅक्शन पॅक लूकमध्ये दिसत आहे.

ट्रेलरने प्रेक्षकांची कमालीची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे याची उत्कंठा लागली आहे. ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT