Salman Khan: अखेर भाईजानने दाखवला मिस्ट्री गर्लचा चेहरा; कोण आहे ती?

Salman Khan Post : सलमान खानने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Salman Khan Post
Salman Khan PostInstagram @beingsalmankhan

Salman Khan And Alizeh Agnihotri :

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमी काही न काही कारणांनी चर्चेत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात सलमान खान एका मुलीसोबतचा दिसत होता. या फोटोमुळे नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले होते.

सलमान खानच्या फोटोमध्ये मिस्ट्री गर्ल सलमानच्या खांद्यावर डोके ठेवून पाठमोरी उभी होती. या पोस्टवर 'मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन'. असे कॅप्शन दिले होते. सलमान खानचा हा फोटो काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या फोटोत त्या मुलीचा चेहरा दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अनेकांनी या पोस्टवर भाईजान लग्न करणार का? ही मिस्ट्री गर्ल कोण? असे अनेक प्रश्न विचारले होते. आज सलमान खानने अखेर या मिस्ट्री गर्लचा चेहरा रिव्हील केला आहे.

सलमान खानने या मुलीसोबतचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत सलमान खानसोबत त्याची भाची अलिझेह अग्नीहोत्री दिसत आहे. त्यामुळे आता या मिस्ट्री गर्लचा खुलासा झाला आहे. यात सलमान खान आणि अलिझेह अग्निहोत्रीने सारख्या रंगाचे आणि पॅटर्नचे कपडे परिधान केले आहेत.

या पोस्टवर सलमान खानने 'आमच्या जीन्समध्येच प्रेम अन् काळजी आहे. आम्ही फक्त आम्ही आहोत.' असं कॅप्शन दिले आहे. सलमान खानने त्याच्या 'बिंग ह्युमन' या कपड्यांच्या ब्रँडमध्ये भाची अलीझेह अग्नीहोत्रीचा समावेश केल्याचे जाहीर केले आहे. या पोस्टमधील सलमान खानचा लूक प्रचंड चर्चेत आला आहे. सलमान खानच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, भाईजानचा 'टायगर ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानची भाची अलिझेह अग्नीहोत्री लवकरच 'फर्रे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Salman Khan Post
Naga Chaitanya And Samantha Prabhu: संमाथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com