Game Changer Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : राम चरणचा गेम चेंजर १०० कोटींच्या क्लबमध्ये, पुष्पा भाऊची कमाई किती?

Ram Charan Game Changer Box Office Collection Day 5: दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा गेम चेंजर चित्रपट ५ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Game Changer Box Office Collection Day 5: दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा पॉलिटिकल अॅक्शन चित्रपट गेम चेंजर १० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पुष्पा २ नंतर साउथ सिनेमाचा हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवात फार शांतपणे झाली पण आता या चित्रपटाने जोर पकडला आहे.

गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाल्यानंतर, गेम चेंजरने ५ व्या दिवशी कलेक्शन वाढ केली असून या चित्रपटाने मंगळवारी १० कोटी रुपये कमावले आहे. यासह, चित्रपटाने देशभरात कलेक्शनमध्ये १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आता हा चित्रपट १०६.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एस. शंकर दिग्दर्शित, गेम चेंजरमध्ये अभिनेता राम चरण एच. राम नंदन आणि त्याचे वडील अप्पाना असा डबल रोल साकारत आहे. कियारा अडवाणी रामची पत्नी दीपिका ही भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या सहाय्यक कलाकारांमध्ये नास्सर, एसजे सूर्या, ब्रह्मानंदम, वेनेला किशोर आणि मुरली शर्मा यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉलीवूड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी गेम चेंजरच्या सोमवारच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे रिपोर्ट शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, "गेम चेंजरचा 'मेक ऑर ब्रेक' सोमवारच्या तुलनेत मंदावला आहे. मकर संक्रांती / पोंगल उत्सवांमुळे आज [मंगळवार] कलेक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. #गेमचेंजर #हिंदी शुक्रवार ८.६४ कोटी, शनिवार ८.४३ कोटी, रविवार ९.५२ कोटी, सोमवार २.४२ कोटी. एकूण: ₹ २९.०१ कोटी.

पुष्पा २ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४१

पुष्पा २ द रुलच्या रिलीजच्या सहाव्या आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. आतापर्यंत, चित्रपटाने १,२२३ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने तेलुगू मधून तब्बल ३३८ कोटी रुपये आणि हिंदीतून ८०४.५ कोटी रुपये कमावले आहेत. पुष्पा २ द रुलच्या तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेंमध्ये अंदाजे ५८.४६ कोटी, ७.७७ कोटी आणि १४.१५ कोटी रुपये कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT