Sunny Deol  Instagram @iamsunnydeols_fan
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Property Auction: गदर २ च्या आनंदावर विरजन; सनी देओलच्या बंगल्याचा होणार लिलाव, काय आहे कारण?

Gadar 2 Actor: सनी देओलची प्रॉपर्टी लिलावात काढण्यात आली आहे.

Pooja Dange

Sunny Deol Received Bank Notice:

सनी देओलची सर्वत्र चर्चा आहे. त्याच्या 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्या प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त ९ दिवसात सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

९० च्या दशकातील या कलाकाराला गेले दोन दशक खूप संघर्ष करावा लागला होता. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नव्हते.

गदर २ प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओलला प्रचंड यश मिळाले आहे. या दिवसाची सनी देओल अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. एकीकडे सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिस घवघवीत यश मिळवत आहे, तर दुसरीकडे त्याची प्रॉपर्टी लिलावात काढण्यात आली आहे.

सनी देओलवर बँकेचे खूप कर्ज आहे. त्यामुळे बँकेने रिकव्हरीसाठी त्याची मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव होत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

काय आहे सनी देओलचे हे प्रकरण ?

बँक ऑफ बडोदाने सनी देओलचा व्हिला लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. सनी देओलने बँकेकडून खूप कर्ज घेतले होते. हे कर्ज घेण्यासाठी सनी देओलने त्याचा मुंबईतील 'सनी व्हिला' गहाण ठेवला होता. आता सनी देओलला ५६ करोड रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. जे त्याने अजूनपर्यंत फेडलेले नाही.

हे कर्ज आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी बँकेने प्रॉपर्टीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात असे म्हटले आहे की, 'सनी व्हिला' २५ सप्टेंबरला लिलावात काढण्यात येणार आहे. या प्रॉपर्टीची रिजर्व प्राईज ५१.४३ करोड रुपये ठेवण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

सनी देओल करियरमधील 'गदर २' हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. ९ दिवसात या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट ४०० करोडचा आकडा पार करेल.

'गदर २'ने भरघोस कमाई करत रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने केजीएफ २ या चित्रपटाचा रेकार्ड मोडला आहे. तसेच १५ ऑगस्ट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

नुकताच हेमा मालिनी यांनी हा चित्रपट पहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी चित्रपटाचे तसेच मुलगा सनी देओलचे देखील भरभरून कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT