Gadar 2 Collection Day 17 Saam TV
मनोरंजन बातम्या

'Gadar 2' Box Office Collection: 'गदर 2'चा तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दरारा; 456 कोटींचा गल्ला पार

Gadar 2 Collection: तिसऱ्या आठवड्यातील रविवारी चित्रपटाने १७ कोटींचे कलेक्शन केले आहे.

Pooja Dange

Gadar 2 Third Weekend Collection:

सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर २' चित्रपटचा प्रदर्शनाच्या १५ दिवसांनी देखील बॉक्स ऑफिसवर दरारा आहे. चित्रपटाचे लक्ष आता ५०० कोटींकडे आहे.

'गदर २' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आणि चित्रपटाने फक्त १३४.४७ कोटींची कमाई केली.

तिसऱ्या आठवड्यातील रविवारी चित्रपटाने १७ कोटींचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाचे कलेक्शन सर्वात कमी म्हणजे १० कोटी इतकेच झाले होते. परंतु शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आहे ४५६.९५ कोटी, असे सॅकनिल्कच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला. हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर एक प्रेमकथा' चित्रपटचा सिक्वेल आहे.

'गदर 2'वर सनी देओलची प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या OMG 2 सह रिलीज होऊनही गदर 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. अलीकडेच, गदर 2 टीमने चित्रपटाच्या प्रचंड यशाबद्दल पत्रकार परिषद घेतली.

प्रेक्षकांचे 'गदर 2'वरील प्रेम पाहून सनी देओलने प्रतिक्रिया देत म्हटले होते, "चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी खूप टेंशनमध्ये होतो. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी संपूर्ण रात्र रडलो आणि हसलो. माझे वडील आजूबाजूला होते. ते मला पाहत होते. मी त्यांना म्हणालो, 'मी दारू पीत नाही. मी खूप खुश आहे, मी काय करू'." (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT