Full On Entertainment: ऑक्टोबर ते में पर्यंत १० चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार, पहा व्हिडिओ... Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Full On Entertainment: ऑक्टोबर ते में पर्यंत १० चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार, पहा व्हिडिओ...

राज्य सरकारने येत्या २२ ऑक्टोबरपासून थिएटर्स खुले करण्यासाठी परवानगी दिली, त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. पहा कोणते चित्रपट तुमच्या भेटीला येणार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने राज्यातील अनेक गोष्टी अनलॉक (Unlock Maharashtra) होत आहेत. पुनःश्च हरिओम या संकल्पनेनुसार अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून शाळा, ७ ऑक्टोबरपासून मंदीरं तर २२ ऑक्टोबरपासूम सिनेमागृहे (Reopening Theaters) उघडण्यात येणार आहे त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Full On Entertainment: 10 movies will be released in theaters from October to May, watch the video)

हे देखील पहा -

थिएटर्स सुरु करण्याच्या निर्णयाचे निर्मात्यांनी स्वागत केले असून दिग्दर्शक रोहित शेट्टी याने मुख्यंत्र्यांतचे आभार मानले आणि आपल्या सिनेमाची रिलीज डेटही जाहिर केली. रोहित शेट्टीचा सिनेमा सुर्यवंशी हा येत्या २९ ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होतोय. त्यानंतर अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी आपापल्या सिनेमांची रिलीज डेट जाहीर केली आहे.

पहा कोण-कोणते कधी चित्रपट रिलीज होतायत

१) २९ ऑक्टोबर - सूर्यवंशी (अक्षय कुमार)

२) १९ नोव्हेंबर - बंटी और बबली २ (सैफ अली खान)

३) ३ डिसेंबर - तडप (अहान शेट्टीचा पहिला चित्रपट)

४) २४ डिसेंबर - १९८३ वर्ल्डकप (रणवीर सिंग)

५) २१ जानेवारी - पृथ्वीराज (YRF - अक्षयकुमार)

६) १४ फेब्रुवारी - लालसिंग चड्ढा (आमिर खान)

७) २५ फेब्रुवारी - जयेश भाई जोरदार (रणवीर सिंग)

८) ४ मार्च - बच्चन पांडे

९) १८ मार्च - शमशेरा (YRF - रणबीर कपूर)

१०) ६ मे - हिरोपंती २

ऑक्टोबर महिन्यापासून थिएटर्स सुरु होणार असून सध्या त्याबाबतची नियमावली बनवण्याचे काम सुरु असल्याचे माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षेत असलेल्या सिनेप्रेमींना आणि प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद हा प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन घेता येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT