OTT Platform google
मनोरंजन बातम्या

OTT Platform: दू'सिकंदर का मुकद्दर' ते 'द मॅडनेसपर्यंत, 'या' वेब सीरिज होणार या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित

OTT Platform November Month End: लोकांना OTT वर घरी बसून चित्रपट आणि मालिका बघायच्या आहेत. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडाही मनोरंजनाचा असेल.

Dhanshri Shintre

लोकांना OTT वर घरी बसून चित्रपट आणि मालिका बघायच्या आहेत. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडाही मनोरंजनाचा असेल. या आठवड्यात अनेक नवीन चित्रपट आणि मालिका ओटीटीला धडकणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला मनोरंजनाचा डोस देणाऱ्या या मालिका आणि चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

Dhootha Movie

धुता (Dhootha)

साऊथचा अभिनेता नागा चैतन्यचा धुता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ते पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे चाहते OTT ची वाट पाहत होते.

Sikandar ka Muqaddar

सिकंदर का मुकद्दर (Sikandar ka Muqaddar)

हिंदी मालिका 'सिकंदर का मुकद्दर' ही एका न सुटलेल्या हिऱ्याच्या दरोड्याची कथा आहे. यात आश्रुत जैन, तमन्ना भाटिया, जिमी शेरगिल, अविनाश तिवारी आणि दिव्या दत्त दिसणार आहेत. ही मालिका 29 नोव्हेंबरला OTT वर रिलीज होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Bloody Beggar

ब्लडी बेगर (Bloody Beggar)

तामिळ चित्रपट ब्लडी बेगर 29 नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काविन, अनारकली नजर, मेरिल फिलिप, सलीमा आणि सुनील सुखदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.

द मॅडनेस (The Madness)

अमेरिकन मालिका 'द मॅडनेस' 28 नोव्हेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होत आहे. या मालिकेत गॅब्रिएल ग्रॅहम, टॅमसिन टोपोल्स्की, मार्शा स्टेफनी ब्लेक, थॅडियस जे. मिक्सन आणि कोलमन डोमिंगो मुख्य भूमिकेत आहेत. हॉलिवूडचे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Parachute

पॅराशूट (Parachute)

तमिळ वेब सिरीज पॅराशूट ही दोन मुलांची कथा आहे जी त्यांच्या घरातून पळून जातात. त्यांचे पालक त्यांना शोधण्यासाठी धडपडत आहेत. या शोमध्ये कृष्णा, किशोर कानी, काली व्यंकट असे कलाकार दिसणार आहेत. ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर २९ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT