Actor Rani Mukerji Love Story Instagram @ranimukherjeeeofficial
मनोरंजन बातम्या

Actor Rani Mukerji: काय सांगता!! राणी मुखर्जी - आदित्य चोप्राच्या लग्नाला झाली १० वर्ष पण एकही फोटो नाही, हे आहे कारण

Rani Mukerji Wedding: अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर राणीने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न केले.

Saam Tv

Actor Rani Mukerji Love Story: अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे ओळखली जाते. ब्लॅकमधील राणीच्या भूमिकाने आजही अंगावर शहरा येतो. राणीच्या अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठले आहेत. 21 मार्च 1978 रोजी कोलकाता येथील बंगाली कुटुंबात राणीचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षी राणीने 'राजा की आयेगी बारात'मधून चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर राणीने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न केले. राणी-आदित्यची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी रंजक नाही. राणीच्या वाढदिवशी जाणून घेऊया, आदित्यच्या प्रेमात ती का वेडी झाली.

'राजा की आयेगी बारात' चित्रपट संपल्यानंतर राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. तर राणीने सांगितले होते की, करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या हिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, 2004 मध्ये यश चोप्रा दिग्दर्शित 'वीर-जारा' चित्रपटापासून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि 2012 मध्ये आलेल्या 'जब तक है जान' चित्रपटाच्या वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आदित्य चोप्राचे त्याची बालपणीची मैत्रिण पायल खन्नासोबत पहिले लग्न केले होते. जवळपास 9 वर्षे वैवाहिक जीवन व्यतीत केल्यानंतर आदित्यने पायलपासून घटस्फोट घेतला. राणीने आदित्यच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांचे नाते बिनसले असे म्हटले जाते. त्यामुळे कदाचित राणी आणि आदित्य दोघेही आपले वैयक्तिक गोष्टी अतिशय खाजगी ठेवतात.

आदित्यच्या कौटुंबिक जीवनात विस्कळीत झाल्यानंतर त्याची आणि राणीच्या नावाची चर्चा सुरू झाली. या चर्चानंतर अखेर राणीने तिचे मौन सोडले आणि सांगितले की, 'घटस्फोटानंतर मी आदित्यला डेट करायला सुरुवात केली. तेव्हा तो माझा निर्माताही नव्हता आणि माझ्या निर्मात्याला डेट करणे ही माझी मी कधीच करू शकत नाही.

जेव्हा राणी आणि आदित्य यांना समजले की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, तेव्हा त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. राणीने सांगितले की, 'आदित्यने मला डेटवर नेण्यापूर्वी माझ्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती'. राणीचे कुटुंब आनंदी होते आणि आदित्यच्या आईचीही तीच प्रतिक्रिया होती. आदित्यचा हाच स्वभाव राणीच्या मनाला भिडला. राणीनेही कबूल केले आहे की, अतिशय शांत आणि साचेबंद आदित्यसोबत राहिल्याने ती एक उत्तम व्यक्ती बनली आहे.

अनेक वर्षे डेट केल्यानंतर आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी 2014 मध्ये इटलीमध्ये गपचूप लग्न केले. त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक होते. राणी-आदित्यच्या लग्नाचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. राणी आणि आदित्य यांना आदिरा नावाची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT