Actor Rani Mukerji: 'या' एका घटनेमुळे राणी मुखर्जी इच्छा नसतानाही अभिनय क्षेत्रात आली

Rani Mukerji Birthday: बॉलिवूडमध्ये राणीला मेहंदी आणि कुछ कुछ होता है सारख्या चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
Rani Mukerji Turns 45
Rani Mukerji Turns 45Instagram @ranimukherjeeeofficial

Actor Rani Mukerji turns 45: राणी मुखर्जीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्ष चाहत्यांच्या हृदयावर केले. आज राणी मुखर्जीचा ४५ वा वाढदिवस आहे. राणी मुखर्जीने 1996 मध्ये 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याआधी राणीने 'बियार फूल' हा बंगाली चित्रपटामध्ये काम केले होते.

बॉलिवूडमध्ये राणीला मेहंदी आणि कुछ कुछ होता है सारख्या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. कधी सून तर कधी मर्दानी बनून तिने सर्वांना चकित आहे. परंतु राणीला कधीच चित्रपटामध्ये काम करायचे नव्हते हे तुम्हाला माहित आहे का? राणीला वकील किंवा इंटिरियर डिझायनर व्हायचे होते.

राणी मुखर्जीने एका मुलाखतीत तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते, हे सांगितले. मुलाखतीतदरम्यान राणी म्हणाली की, त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यावेळी मला एक ऑफर आली, तेव्हा आई म्हणाली प्रयत्न करून पाहा. जर काही नाही जमलं तर तू पुन्हा अभ्यास सुरू कर. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला इच्छा नसतानाही बॉलिवूडमध्ये पाऊल टाकावे लागले.

Rani Mukerji Turns 45
Natu Natu Viral Video : 'नाटू-नाटू' गाण्यावर माणसंच नाही तर कार देखील थिरकल्या; पहा भन्नाट व्हिडिओ

राणी मुखर्जीने सांगितले की, आता ती बॉलिवूड इंडस्ट्रीच्या प्रेमात आहे. पण जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा ती अजिबात आनंदी नव्हती. कारण ती जिथून आली आहे, तिथं कुणी याविषयी बोलतच नाही. माझ्या कुटुंबाला पैशाची नितांत गरज होती, ती गरज भागवण्यासाठी मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राणीने असेही सांगितले की, यापूर्वी तिला आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती जायची जाणीव नव्हती. कारण तिच्या आई-वडिलांनी राणीला जे आयुष्य दिलं, त्यात तिला असं कधीच वाटलं नाही.

राणी पुढे म्हणाली की, त्यावेळी मी याचा फारसा विचार केला नाही. कारण कोणत्याही मुलाला असे वाटत नाही की त्याचे पालक चांगले काम करत नाहीत. मला या आनंद आहे की त्यांनी हे काम केलं. कारण मी माझ्या प्रोफेशनच्या प्रेमात आहे. राणीचे वडील राम मुखर्जी यांनी 'हम हिंदुस्तानी', 'लीडर' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. याशिवाय, ते फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते.

राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट 17 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांकडूनही दाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते.

सागरिका भट्टाचार्य यांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे. त्याचबरोबर निखिल अडवाणी, मोनिशा अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी याची निर्मिती केली आहे. यात राणीशिवाय जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com