Ashok Nikalje Fraud Case Saam TV
मनोरंजन बातम्या

Fraud Case: बनावट पोलिस भासवत गायक अशोक निकाळजेंची फसवणूक

प्रसिद्ध गायक अशोक निकाळजे यांची काही चोरट्यांनी पोलीस भासवत फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी निकाळजेंना एका गायनाच्या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून फोन आला होता.

सुरज सावंत

मुंबई : प्रसिद्ध गायक अशोक निकाळजे यांची काही चोरट्यांनी पोलीस भासवत फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी निकाळजेंना एका गायनाच्या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून फोन आला होता. त्या व्यक्तीने अशोक निकाळजेंना गायनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले. तसेच त्यांच्याकडे त्या व्यक्तीने सेलिब्रिटी आणण्याचीही जबाबदारी दिली होती.

जबाबदारी दिल्यानंतर काही सेलिब्रिटींचे संपर्क क्रमांकही देण्यात आले होते. सेलिब्रिटींना त्या कार्यक्रमाला आणण्याची जबाबदारी अशोक निकाळजे यांच्यावर होती. आयोजकांकडून सेलिब्रिटींना आणण्यासाठी लागणाऱ्या फीचे पैसे पाठवल्याचा बनावट मॅसेज निकाळजेंना पाठवला. पैसे न आल्याचे निकाळजेंनी सांगितल्यावर पैसे संध्याकाळपर्यंत येतील अशी ही बतावणी केली.

आपण आयपीएस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत पैसे देण्याची हमीही दिली. दरम्यान त्याचवेळी निकाळजेंनी संबधित सेलिब्रिटीला फोन केला असता त्यानेही तात्काळ पैसे दिल्यावरच आपण कार्यक्रमाला येऊ, असे सांगितले.

निकाळजेंना आयोजकांकडून पैसे येतील या ठाम विश्वासाने त्यांनी संबधित सेलिब्रिटीला अडीच लाख रुपये इतके मानधनही दिले. मात्र कालांतराने आयोजकांचाही आणि सेलिब्रिटीचाही फोन बंद येऊ लागला. आयोजकांकडूनही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने निकाळजेंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी निकाळजेंनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात कलम १७०, ४२० भादवी कलमांतर्गत हनीफ शेख व आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. टिळक नगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र अशाच प्रकारे बेळगाव निपाणीची एक टोळी ऑर्केस्ट्रा व गायकांना गंडा घालत असल्याची माहिती निकाळजेंनी 'साम टिव्ही'ला दिली आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT