Sherika De Armas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sherika De Armas: माजी मिस वर्ल्ड कंटेस्टंटचे २६ व्या वर्षी निधन, धक्कादायक कारण आलं समोर...

Sherika De Armas Death: शेरिका डी अरमासच्या निधनाने चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला.

Priya More

Sherika De Armas Died:

माजी मिस वर्ल्ड (former miss world) स्पर्धक शेरीका डी अरमासचे निधन झाले आहे. शेरीकाने २०१५ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, शेरिका डी अरमासची (sherika de armas) गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज सुरू होती.

शेरिका डी अरमासला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान शेरिकाचे निधन झाले. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाने चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला.

शेरीका डी अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तिच्या निधनामुळे उरुग्वे देशासह जगभरात शोककळा पसरली आहे. शेरीकाच्या निधनाची बातमी तिचा भाऊ मायाक डी अरमास याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'उंच उड्डाण घेत राहा. माझी छोटी बहीण कायम राहशील.'

मिस युनिव्हर्स उरुग्वे २०२२ कार्ला रोमेरोने शेरीकाच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मिस डी आर्मास या जगासाठी खूप विकसित झाली होती. ती मला भेटलेल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक होती.'

मिस उरुग्वे २०२१ लोला डे लॉस सॅंटोसने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत डी आर्मासला आदरांजली वाहिली. तिने पोस्टमध्ये असे लिहिले की, 'तुम्ही मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मला पुढे जाताना तुला पाहायचे होते यासाठी मी तुला नेहमी लक्षात ठेवीन. '२०१५ मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत २६ वर्षीय शेरीका डी अरमास पहिल्या ३० मध्ये नव्हती. ती या स्पर्धेत सहभागी होणारी १८ वर्षीय मुलींपैकी एक होती.

मिस वर्ल्ड स्पर्धेवेळी नेटउरुग्वेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, 'मला नेहमीच मॉडेल व्हायचे होते. मग ते सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि मला वाटते की सौंदर्य स्पर्धांमध्ये, मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद होत आहे.' दरम्यान, शेरीका डी आरमासने तिचे स्वतःची मेक-अप लाइन देखील सुरू केली होती. शेरीका आरमास स्टुडिओ नावाने केस आणि पर्सनल केअर उत्पादने विकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT