Follower Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Follower Movie: सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट; 'फॉलोअर' चित्रपटाचा टीजर लाँच

Follower Marathi Movie: महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वादात अडकलेल्या तरुणाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात आहे.

Shruti Kadam

Follower Marathi Movie: रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या "फॉलोअर" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून, मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात आहे.

'फॉलोअर'ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वाद आहेत. हा विषय अपवादानंच चित्रपटात हाताळला गेला आहे. चित्रपटाच्या टीजरमधून पत्रकार असलेल्या तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कथा हाताळण्यात आल्याचं दिसतं. या कथेला नातेसंबंध, राजकारण असे पदर असल्याचंही जाणवतं. चित्रपटाचा टीजर पहिल्या फ्रेमपासूनच गुंतवणारा आहे. चित्रपटातील कलाकार नव्या दमाचे असले, तरी रॉटरडॅमसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटातून एक अनोखी गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा टीजर कुतूहल वाढवणारा आहे. आता 'फॉलोअर'ला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॉलो करावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT