Maharashtra Epstein Files Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Maharashtra Epstein Files Movie First Look: भोंदू अशोक खरातवर आधारीत 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मुंबईत शुटिंग सुरू झाले आहे.

Priya More
  • 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' चित्रपटाचे मुंबईत शूटिंग सुरू

  • सेटवरील पहिला फोटो समोर आला

  • दिपाली सय्यद रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत

  • अशोक खरातची भूमिका साकारणारा अभिनेत्याबाबत उत्सुकता

अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर आधारित 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला मुंबईमध्ये सुरूवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरून पहिला फोटो समोर आला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. दिपाली सय्यद आणि त्यांच्यासोबत भोंदू अशोक खरातची भूमिका साकारणारा अभिनेता या फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक समोर आला असून त्या हुबेहुब रुपाली चाकणकर यांच्यासारख्याच दिसत आहेत. या चित्रपटामध्ये भोंदू अशोक खरातची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याबाबत कमालिची गोपनियता पाळण्यात आली आहे. फर्स्ट लूकमध्ये दिपाली सय्यद यांच्यासोबत भोंदू खरातची भूमिका साकारणारा अभिनेता पाठमोरा उभा राहिल्यामुळे तो नक्की कोण आहे? हे कळत नाही आहे. पण हा अभिनेता कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत अनेक नेत्यांची नावं समोर आली होती. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजल्यानंतर त्यावर आधारीत चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटामुळे राजकीय आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली. या चित्रपटामध्ये दिपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांना अनेक धमक्यांचे फोन आले होते.

दिपाली सय्यद यांनी या चित्रपटामध्ये काम करू नये आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला आणि त्यांना वारंवार धमक्या दिल्या गेल्या. ऐवढेच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. असे असताना देखील दिपाली सय्यद यांनी कितीही धमक्या आल्या तरी मी या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

भोंदू अशोक खरातवर आधारित 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप बी सावंत हे आहेत. त्यांनी अशोक खरातच्या प्रकरणाला ७० एमएम पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे. या चित्रपटाबाबत सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाद्वारे अशोक खरातचे काळेधंदे सर्वांसमोर येतील. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. यामध्ये दिसणारा कॅप्टन भोंदूबाबा कोण? अशी चर्चा सुरू झाली होती. अजूनही या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेत कोण असणार? हे स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

फक्त २ मिनिटांचा चमत्कार! 'ओम' च्या उच्चाराने शरीरात होतील 5 मोठे बदल

SCROLL FOR NEXT