Filmfare Awards Saam Tv
मनोरंजन बातम्या

Filmfare Awards : विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह'ला अनेक फिल्मफेअर, सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री कोण? पाहा यादीच

काल म्हणजे ३० ऑगस्टला फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित अवॉर्ड शो 'फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२' नुकताच पार पडला आहे. चाहत्यांसोबत अनेक कलाकारही या शोची आतुरतेने वाट पाहत होते. या शोमध्ये बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon) यांनी ६७ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. काल म्हणजे ३० ऑगस्टला फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कबीर खानच्या '83' मध्ये माजी भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी रणवीरला हा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी 'मिमी' या समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटात सरोगेट आईच्या भूमिकेसाठी कृतीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेर शाह' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

विष्णुवर्धन दिग्दर्शित 'शेरशाह' हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या मेजर विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटासाठी विष्णुवर्धन याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, ​​विक्रम बत्रा आणि त्याचा जुळा भाऊ विशाल बत्रा यांच्या दुहेरी भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात जावेद जाफरी, शिव पंडित यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले होते.

लक्ष्मण उतेकर यांच्या 'मिमी'साठी पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. समीक्षक (critics) श्रेणीमध्ये, विकी कौशलने 'सरदार उधम सिंह' मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. या चित्रपटात त्यांनी क्रांतिकारी नेते उधम सिंह यांची भूमिका साकारली होती. उधम सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये मायकेल ओडवायरला गोळ्या घातल्या होत्या.

याशिवाय विद्या बालनला 'लायनेस'साठी सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटात, विद्या बालन ही व्हिन्सेंट या वन अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसली होती. जी स्थानिक टीमचे नेतृत्व करून एका भयानक वाघिणीला पकडण्याचा विचार करते.

आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या 'चंदीगढ करे आशिकी'ला सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला तर विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह'ला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT