कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रहमानचं नाव; ट्विट करुन दिली माहिती

म्युझिक डायरेक्टर ए आर रहमान यांनी मार्कहमच्या महापौरांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
ar rahman
ar rahmanSaam Tv
Published On

नवी दिल्ली : एआर रहमानच्या (AR Rahman) नावावर अनेक सन्मान आहेत. आता गायक आणि संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांना सन्मानित करण्याचा मोठा निर्णय कॅनडामध्ये घेण्यात आला आहे. कॅनडातील एका रस्त्याला ए आर रहमान यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडाच्या मारखम शहरातील एका रस्त्याला एआर रहमान असे नाव देण्यात आले आहे.

ar rahman
Shilpa Shetty : पायाला दुखापत होऊनही शिल्पा शेट्टीनं केलं लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत

संगीतकार ए आर रहमान (AR Rahman) यांना नुकतेच कॅनडा सरकारने सन्मानित केले आहे. रहमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यासोबतच त्याने यांनी पोस्टच्या माध्यमातून कॅनडाच्या महापौर आणि तेथील जनतेचे आभारही मानले आहेत.

ar rahman
छातीत दुखू लागल्याने KRK रुग्णालयात दाखल; वादग्रस्त ट्विटमुळे मुंबई पोलिसांनी केली होती अटक

म्युझिक डायरेक्टर ए आर रहमान (AR Rahman) यांनी मार्कहमच्या महापौरांसोबतचे फोटो शेअर ट्विट केले आहेत. "मार्खम सिटी, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या लोकांनी दिलेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञ." असं ट्विट त्याने केले आहे. २०१३ मध्ये, मारखम मधील आणखी एका रस्त्याला ए आर रहमान - अल्लाह-राखा रहमान सेंट, असं दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com