Mahesh Tilekar Post Facebook
मनोरंजन बातम्या

Mahesh Tilekar Post: ‘चारेक जण सोडले तर इतरांनी सरड्याप्रमाणे रंग बदलले...’ महेश टिळेकर यांच्या पोस्टने सगळेच चक्रावले

Mahesh Tilekar News: महेश टिळेकर यांची सध्या एक सोशल मीडिया पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Mahesh Tilekar Post

सध्या सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री नवीन घर, नवीन कार खरेदी करत आहेत. श्रावण महिना हा शुभ महिना मानला जातो. याच महिन्याचं औचित्य साधत गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी नवीन घर आणि नवीन कार खरेदी केली. याच आधारावर चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टवर त्यांनी सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधलेय.

महेश टिळेकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या त्यांची एक पोस्ट बरीच चर्चेत आली आहे. महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अभिनेते मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे. तसेच महेश टिळेकर यांनी अन्य कलाकारांबाबत ही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

महेश टिळेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार. कलाक्षेत्रात गेली तीस एक वर्ष काम करीत असताना आपण केलेल्या संघर्षाची जाणिव ठेवून इतरांना जमेल तशी मदत करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. पण नंतर मुखवट्या मागचे खरे चेहरे कळल्यावर आपण मदत केलेले हेच ते कलाकार का? हा प्रश्न नेहमीच पडायचा. पण काही बोटावर मोजणारे आहेत की ज्यांनी जाहीरपणे कृज्ञतापूर्वक केलेल्या मदतीची जाणीव व्यक्त केली. त्यातीलच एक अभिनेता मिलिंद गवळी.”

महेश टिळेकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, “बऱ्याच कलाकारांची हयात जाते पण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. काही उत्तम ,नावाजलेले कलाकार मरेपर्यंत भाड्याच्या घरातच राहिल्याचं मी अगदी जवळून पाहिलं आहे. आपल्या ओळखीचा , नावाचा फायदा आपल्या बरोबर इतरही मराठी कलाकारांना व्हावा, त्यांचीही मुंबईत हक्काची घरे व्हावीत म्हणून मी 15 वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले.अनेक खस्ता खाल्ल्यावर प्रयत्नांना यश आले आणि माझ्या बरोबर 12 गरजू ( त्यावेळी 13 वर्षांपूर्वी )कलाकार आणि तंत्रज्ञांना 2012 मध्ये सरकारी कोट्यातून मी माफक किमतीतील घरे मुंबईतील उच्चभ्रू भागात मिळवून दिली. त्यावेळी ज्यांना घरे मिळवून दिली त्या सर्व मराठी कलाकारांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून खूप समाधान वाटलं होतं. पण हे समाधान फार काळ टिकले नाही.” (Serial)

महेश टिळेकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, “चार एकजण सोडले तर इतरांनी काम झाल्यावर सरड्या प्रमाणे रंग बदलले. घरी जेवायला चहाला नक्की यायचं तुम्ही असं हक्काने म्हणणाऱ्या कलाकारांनी घरात रहायला येऊन वर्षे होऊन गेली तरी घरी काही बोलावलं नाही आणि चांगली किंमत आल्यावर हे कलाकार घरे विकून करोडो रुपयांचा नफा मिळवून मोकळे. असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर आपल्या ह्याच मराठी कलाकारांसाठी आपण रक्त आटवून प्रयत्न केले याचा पश्चाताप नक्कीच झाला. यातल्या एका कलाकाराला बँकेचे हफ्ते भरायला पैसे नसताना अनेकदा आर्थिक मदत करूनही पैसे परत मिळवताना या कलाकाराने माझ्या तोंडचं पाणी पळवले होते वर " इतकं काय पैश्यासाठी मागे लागलात ,तुम्हाला काय कमी आहे?" अमुक एक तारखेला पैसे परत देतो असा शब्द देऊनही अनेक वेळा ते पैसे वेळेवर परत न करणाऱ्या कलाकाराला वेळोवेळी पार्ट्या करायला, बाहेर फिरायला जायला पैसे असायचे..” (Entertainment News)

महेश टिळेकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, “एका अभिनेत्रीने तर माझ्या एका तंत्रज्ञानाला मिळालेला आणि चांगला व्ह्यू असलेला फ्लॅट, तिचा लकी नंबर असल्याचं सांगून तो फ्लॅट तिला मिळवून देण्यासाठी मला विनंती केली. मी सांगितल्यामुळे आणि मीच फ्लॅट मिळवून दिला असल्यामुळे माझ्या एका शब्दावर त्याने स्वतः चा फ्लॅट त्या अभिनेत्रीला ट्रान्स्फर केला आणि तिचा फ्लॅट त्याने घेतला. ही अभिनेत्री तिला लकी नंबर असलेल्या फ्लॅट मध्ये कधीच रहायला आली नाहीच. तिच्या वेग वेगळ्या कलाकार मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठी च तिथे यायची. पाच वर्षांनी तिथे तो फ्लॅट विकला तेंव्हा चांगला व्हू असल्यामुळे तिला त्या फ्लॅटचे ज्यादा पैसे मिळाले . करोडो रुपये मिळूनही या कृतघ्न अभिनेत्रीच्या मनात साधा विचारही आला नाही की ज्या व्यक्तीने त्याचा फ्लॅट आपल्याला ट्रान्स्फर केला त्या तंत्रज्ञाला माणुसकी म्हणून काहीतरी द्यावे..”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात महेश टिळेकर म्हणतात, “फोन करून मी तिला झापल्या वर तिच्या नशिबात होता म्हणूनच तिला तो फ्लॅट मिळाल्याचे तिने उत्तर दिले आणि " तुमची एवढीच इच्छा असेल मी त्याला काही द्यावे तर मी त्याला चांदीचे एक निरांजन गिफ्ट देते " असं ती बोलल्यावर तिच्यात किती दानत आहे याचा मला अंदाज आला .याच अभिनेत्रीने नंतर एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पैसेवाल्या अधिकाऱ्या बरोबर लग्न केले . काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर ही अभिनेत्री तिच्या नवऱ्या बरोबर समाजकारणात येणार असल्याचे कळवून सांगत होती. तो तिचा अभिनय पाहून मी थक्क झालो.अभिनेता मिलिंद गवळी सारखे केलेल्या मदतीची जाणीव ठेवणारे काही कलाकार आहेत म्हणून काही कलाकारांमध्ये माणुसकी आहे याची प्रचिती येते.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT