Nagraj Manjule Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Nagraaj Manjule: डायलॉग ‘पठान’चा, प्रमोशन ‘घर बंदूक बिरयानी’; नागराज अण्णाचा बिघडू दे Video Viral !

नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. सध्या चित्रपटातील काही मीम सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, अशीच एक मिम दिग्दर्शकांनी शेअर केली आहे.

Chetan Bodke

Nagraj Manjule Viral Video: नागराज मंजुळे प्रमुख भूमिकेत असलेले हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. सर्वत्रच चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे, या चित्रपटात अनेक दिग्गज सेलिब्रिटी असून काही नवख्या कलाकारांना ही यामध्ये संधी देण्यात आली आहे.

अशातच अवघ्या काही दिवसांवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख येऊन ठेपलेली आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशन सोशल मीडियावर चांगलाच जोर आलेला आहे. सध्या चित्रपटातील काही मीम सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, अशीच एक मिम दिग्दर्शकांनी शेअर केली आहे.

मीम हेही एक प्रमोशनच्या दृष्टीने प्रभावशाली साधन ठरलं आहे. मग अशातच दिग्दर्शक नागराज अण्णा तरी कुठे मागे राहतील? नागराज यांनी शाहरुख खानच्या 'पठान' मधील एक धमाकेदार संवाद वापरत 'घर बंदूक बिरयानी'च्या प्रमोशनसाठी एक मीम व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला असून चाहत्यांच्याही भन्नाट कमेंट त्या व्हिडीओला येत आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘अपनी कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिघडने वाला है...’ तर ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये नागराज यांच्या तोंडी ‘बिघडू दी’ असा संवाद आहे. दोन्ही सिनेमातील संवाद एकत्र करत हा मजेशीर व्हिडिओ तयार करण्यात आला असून तो सोशल मीडियावर तो व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींनीही त्यांच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. नागराज मंजुळेंच्या या व्हिडीओवर जितेंद्र जोशी, श्रेया बुगडे या कलाकारांनी कमेंट करत कौतुक केले आहे. नागराज अण्णांचे कौतुक करताना प्रेक्षकांचे शब्दही अपुरे पडत आहेत. नेहमीच काही तरे हटके प्रेक्षकांना भेट देणाऱ्या नाजराज मंजुळेंचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की ते या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत.

‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमात नागराज मंजुळे एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका चित्रपटात दिसणार आहे. सायली पाटील आणि आकाश ठोसरची नवीन रॉमेंटिक जोडी प्रेक्षकांना फारच भावली. तर नागराज यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री दीप्ती देवी आहे. आता ही जबरदस्त टीम मिळून बॉक्स ऑफिसवर किती रुपयांचा गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT