Urfi Javed: आधी अननस आणि आता किवी, या उर्फीताईंचं करायचं तरी काय? फॅन्सनी मारला कपाळावर हात

कधी पानं फुलं, कधी मोबाईलचे सिम कार्ड तर कधी टोपलीचा वापर करुन उर्फीने फोटोशूट केले. पुन्हा एकदा उर्फीने हटके फोटोशूट केले आहे.
Urfi Javed Kiwi Fruit Photoshoot
Urfi Javed Kiwi Fruit PhotoshootSaam Tv

Urfi Javed New Photoshoot: बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या हटक्या ड्रेसमुळे ती इंडस्ट्रीतील सर्वात वादग्रस्त कलाकारांपैकी एक बनली आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो, हॉट फोटोशूट आणि डान्स रील्स शेअर करते. तिच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Urfi Javed Kiwi Fruit Photoshoot
Ghar Bandook Biryaani: जबरदस्त! खरेखुरे पोलीस नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'सिनेमात

बडे भैय्या की दुल्हनिया, चंद्र नंदिनी, बेपन्नाह, कसौटी जिंदगी की सह अन्य शो मधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या हटक्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी पानं फुलं, कधी मोबाईलचे सिम कार्ड तर कधी टोपलीचा वापर करुन उर्फीने फोटोशूट केले.

पुन्हा एकदा उर्फीने हटके फोटोशूट केले आहे.  उर्फीने इंस्टाग्रामवर तिचा लूक शेअर केला, ज्यामध्ये ती किवी फळांपासून बनवलेला टॉप घालून फोटोशूट केले आहे. तिच्या या नव्या लूकने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्यासाठी तिला ट्रोल केले जात आहे.

यावर तिला नेटकरी म्हणतात, ‘मी गहू विकुन मोबाईल रिचार्ज केला, मला वाटलं नव्हतं की इतकं विचित्र फोटोशूट पाहायला मिळेल.’, तर आणखी एक नेटकरी म्हणतो, ‘काय योगायोग आहे. मी पण शुद्ध शाकाहारी आहे. उर्फीची पोस्ट पाहून मला किवी फ्रुट खायचं आहे.’ असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com