Vanita Kharat: लग्नानंतरच्या पहिल्याच गुढीपाडव्याला वनिता नवा संकल्प, ‘या’ नव्या कामांनी करणार नववर्षाचा श्रीगणेशा

वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा हा पहिलाच मोठा सण आहे. मराठी नववर्षानिमित्त वनिताने एक संकल्प केला आहे.
Vanita Kharat New Year Resolution
Vanita Kharat New Year ResolutionInstagram/ @vanitakharat19

Vanita Kharat New Year Resolution: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात जेवढी आपल्या अभिनयाने चर्चेत आहे, तितकीच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. हल्लीच तिने बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. तिचा हा लग्नानंतर पहिलाच मोठा सण आहे. मराठी नववर्षानिमित्त वनिताने एक संकल्प केला आहे.

वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील, हळदीचे, प्री- वेडिंग फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षशः धुमाकूळ घातला होता. तिच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्वच कलाकारांनी उपस्थित लावली होती.

Vanita Kharat New Year Resolution
Urfi Javed: आधी अननस आणि आता किवी, या उर्फीताईंचं करायचं तरी काय? फॅन्सनी मारला कपाळावर हात

नुकतेच गुढीपाडवा निमित्त वनिताने आपल्या नव्या संकल्पाबाबत सांगितले. तिने हा सकाळ संकेतस्थळासोबत बोलताना सांगितलं. ती म्हणते, “ येणाऱ्या या वर्षात मला खूप कामं करायची आहेत. मुख्य बाब म्हणजे, मला खूप झाडे लावायची आहेत. सोबतच नवीन वर्षात माझा नवा चित्रपट देखील येतोय. त्याची माहिती मी लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देणार आहे. एक नवीन नाटक सुद्धा मला प्लॅन करायचा विचार आहे.”

Vanita Kharat New Year Resolution
Ghar Bandook Biryaani: जबरदस्त! खरेखुरे पोलीस नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'सिनेमात

सोबतच वनिता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या पहिल्या मराठी चित्रपटात अर्थात स्कूल, कॉलेज आणि लाईफ चित्रपटात ती दिसणार आहे. नुकताच चित्रपटातून तिची पहिली झलक प्रेक्षकांना अनुभवता आली. सोबतच वनिता ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात देखील ती झळकणार आहे.

वनिता आणि तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेची लग्नानंतरची पहिलाच गुढीपाडवा आहे. या दोघांनीही २ फेब्रुवारीला लग्न गाठ बांधली होती. वनिता आणि सुमित थाटामाटात आणि एकदम धूमधडाक्यात लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी ही उपस्थिती लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com