Kaushik LM Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kaushik LM: दाक्षिणात्य चित्रपट समीक्षक कौशिक एलएम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

Shivani Tichkule

Kaushik LM Dies: कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे समीक्षण करणारे प्रसिद्ध समीक्षक कौशिक एलएम (Kaushik LM) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील (Movies) कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

हे देखील पाहा -

कौशिक एलएम यांना मनोरंजन क्षेत्राची सखोल माहिती आणि अभ्यास असणारे म्हणून ओळखले जात होते. कौशिक एलएम हे एक प्रसिद्ध एंटरटेनमेंट ट्रॅकर, इन्फ्लुएंसर, यूट्यूब व्हिडिओ जॉकी आणि चित्रपट समीक्षक होते. त्यांनी अनेक तामिळ, तेलुगू या भाषेतील चित्रपटांचे समीक्षण केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रसिद्ध समीक्षक असे त्यांची ओळख होती.

त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांसह इतर कलाकारांना धक्का बसला आहे. कौशिक एलएम यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केल्या आहेत. अगदी लहान वयात जगाचा निरोप घेणारे कौशिक एलएम तामिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT