Randeep Singh Bhangu Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Randeep Singh Bhangu Death : प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्याने छोट्या चुकीमुळे गमावला जीव, दारू समजून प्यायला किटकनाशक

Randeep Singh Bhangu Passed Away : प्रसिद्ध पंजाबी अभिनेता रणदीप सिंह भंगू याला आपली एक छोटी चूक महागात पडली. त्या चुकीमुळे अभिनेत्याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले आहे.

Chetan Bodke

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप सिंह भंगू याचं निधन झाले आहे. त्याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याला त्याची एक चूक चांगलीच महागात पडली आहे. या चुकीमुळे अभिनेत्याने आपला जीवच गमावला आहे. अभिनेत्याने दारू समजून किटकनाशकाचं औषध प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

रणदीप सिंह भंगू हा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटु्ंबीयांसह त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दारू समजून किटकनाशक प्यायल्याने अचानक अभिनेत्याची तब्येत ढासळत गेली. त्यानंतर त्याला लगेचच चंदीगढमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण त्याची उपचाराअंती प्राणज्योत मालवली. अभिनेत्यावर चमकौर साहिबजवळील चुहाडमाजरा या त्याच्या गावी काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याला दारुचं व्यसन लागलं होतं. तेच व्यसन त्याच्या अंगलट आलं आहे. तो आधीपासूनच नशेत होता. शेतात ठेवलेली किटकनाशकाची बाटली घेऊन दारू समजून ती प्यायली. अनेक सेलिब्रिटी मंडळींसह चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. रणदीप भंगू एक उत्कृष्ट अभिनेता तर होताच पण त्यासोबत तो उत्कृष्ट कबड्डीपटू ही होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT