फातिमा सना शेख सध्या तिच्या 'मेट्रो इन दिनों' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.फातिमा सना शेख सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात एका मीडिया मुलाखतीत फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली की, मला अमेरिकेला जात असताना तिला फ्लाइटमध्ये झटके येऊ लागले. म्हणून मला औषधांचा जास्त डोस देण्यात आला. नेमकं त्यावेळी घडलं काय जाणून घेऊयात.
फातिमा सना शेखने मुलाखतीत सांगितले की, "मी अमेरिकेला जात असताना मला अचानक फ्लाइटमध्ये झटके येऊ लागले. त्यामुळे मला दुबई विमानतळावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मला औषध देऊन सुद्धा झटके थांबत नव्हते. म्हणून मला खूप जास्त डोस देण्यात आला. मला एकाच वेळी दोन प्रकारची औषधे देण्यात आली. मी वेगळे औषध घेत होते आणि मला रुग्णालयात वेगळे औषध देण्यात आले. मी पूर्णपणे नशेत होते. "
पुढे फातिमा म्हणाली की, "वैद्यकीय इमर्जन्सीमुळे मला 'सम बहादूर' आणि 'धक धक'चे शूटिंग थांबवावे लागले. मला फोन आला की मॅडम, तुम्ही शूटिंग करू शकता का? मी रडले कारण त्या औषधांमुळे मला बेडवरून उठणे कठीण झाले होते. मी अंथरुणावरुन उठू शकत नव्हते. माझ्या भावना नियंत्रणात नव्हत्या. सपोर्ट ग्रुप आणि मोकळ्या संवादामुळे मला खूप आराम मिळतो. मला बऱ्याच काळापासून कोणताही झटका आला नाही."
फातिमा सना शेख हिला अपस्मार (Epilepsy) हा आजार आहे. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये वारंवार, विनाकारण झटके येतात.
फातिमा सना शेखचा आगामी 'मेट्रो इन दिनों' चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'आप जैसा कोई' चित्रपट नेटफ्लिक्सवर 11 जुलाईपासून पाहता येणार आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपट अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीना गुप्ता हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.