Farahan Akhtar Upcoming Movie : बॉलीवूडमध्ये कधी अभितेना, कधी गायक तर कधी निर्मात्याच्या भूमिकेतून समोर आलेला फरहान खान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता. आता मात्र तो पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असून '१२० बहादूर' या आगामी चित्रपटात तो काम करणार असून या संदर्भातील पोस्ट त्याने आपल्या X अकाऊंटवरून शेअर केली आहे. भारत-चीनदरम्यानच्या १९६२ च्या युद्धावर आधारित हा चित्रपट असून त्यात फरहान मेजर शैतान सिंग यांची भूमिका सकरणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
भारत आणि चीन यांच्यादरम्यान १९६२ मध्ये झालेल्या प्रसिद्ध रेझांग लाच्या युद्धावर आधारित हा सिनेमा आहे. फरहानने याआधी 'लक्ष्य' हा कारगिल युद्धावर आधारित सिनेमा दिग्दर्शित केला होता. आता भारतीय सैनिकांवर आधारित '१२० बहादूर' या सिनेमात फरहान सैनिकाची भूमिका साकारत आहे. फरहान अख्तरने (Farahan Akhtar) ४ सप्टेंबरला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या सिनेमाची पहिली झलक असलेले पोस्टर शेअर केले.
फरहानने या सिनेमाचे जे पोस्टर शेअर केले आहे. ज्यात त्याची पाठ दिसत असून त्याच्या हातात बंदूक आहे. त्याच्या समोर हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत दिसत आहे. आजूबाजूच्या पर्वतांवर हल्ल्याचे दृश्य दिसत आहे.
फरहानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ''त्यांनी जे साध्य केले ते कधीही विसरता येणार नाही. परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंग आणि १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीच्या सैनिकांची कहाणी सादर करत आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारत-चीन दरम्यान लढलेली रेझांग लाची प्रसिद्ध लढाई आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि निस्वार्थीपणाची कहाणी आहे. या अद्भुत कथेला पडद्यावर आणण्यासाठी भारतीय लष्कराचे संपूर्ण सहकार्य मिळाले, याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.''
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने कधी पडद्यामागे राहून तर कधी पडद्यावर येऊन अनेक उत्तम कलाकृती बॉलीवूडला दिल्या आहेत. त्यामध्ये 'दिल चाहता है', 'लक्ष्य', 'डॉन' या सिनेमात पडद्यामागे दिग्दर्शक म्हणून उभा राहून प्रेक्षकांना उत्तम आशय आणि मनोरंजन दिले. तर 'रॉक ऑन' सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण करत, पुढे आलेल्या 'भाग मिल्खा भाग' मधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.