Farhan Akhtar New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Farhan Akhtar New Car: बॉलिवूड अभिनेता, चित्रपट निर्माते आणि संगीतकार फरहान अख्तरने त्याच्या गॅरेजमध्ये एक नवीन गाडी आणली आहे. त्याने दिवाळीनिमित्ताने नवीन मर्सिडीज खरेदी केली.

Shruti Vilas Kadam

Farhan Akhtar New Car: बॉलीवूड अभिनेता, चित्रपट निर्माते आणि संगीतकार फरहान अख्तरने यावर्षी दिवाळीनिमित्ताने नवीन मर्सिडीज खरेदी केली. सर्वात आलिशान एसयूव्हींपैकी एक असलेल्या ब्रँड न्यू मर्सिडीज-मेबॅक GLS600 सह त्याने खरेदी केली आहे. या गाडीची किंमत अंदाजे 3.15 कोटी (एक्स-शोरूम) आहे.

रॉक ऑन! स्टारचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. यामध्ये तो मुंबईच्या वांद्रे परिसरात त्याच्या नवीन खरेदी केलेल्या मेबॅकमधून बाहेर पडताना दिसत आहे. फरहान अख्तर त्याची पत्नी शिबानी दांडेकरसह त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि बाहेर वाट पाहणाऱ्या पत्रकारांनी त्याचे स्वागत केले.

फरहान अख्तरने नवीन कार खरेदी केली

क्लिपमध्ये, फरहान अख्तर त्याच्या गडद हिरव्या एसयूव्हीच्या मागच्या सीटवरून बाहेर पडताना दिसत आहे, ज्याच्या समोरील ग्रिलवर झेंडूचा माळा लटकलेला होता. या कपलने एकत्र छान फोटो काढून आलेल्या पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मर्सिडीज-मेबॅक GLS600 बद्दल

मर्सिडीज-मेबॅक GLS600 ही आलिशान गाडी आहे. ४.०-लिटर V8 ट्विन-टर्बो इंजिन आणि ४८V माइल्ड-हायब्रिड सिस्टमद्वारे, ती ५५७ bhp आणि ७३० Nm टॉर्क निर्माण करते. ही गाडी आरामासाठी डिझाइन केलेले आहे, यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह हाय बीम असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह लेन कीपिंग आणि ब्लाइंड स्पॉट असिस्ट, ८ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरे आणि ऑफ-रोड मोड यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Doctor death : 'भाजपाच्या महान महिला गप्प का?' फलटण महिला डॉक्टर प्रकरणी ठाकरेंच्या शिलेदाराचा सवाल

काँग्रेसकडून अजित पवार गटाला जबरदस्त धक्का! बड्या नेत्यासह २३ जण हाती घड्याळ बांधणार

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

Pune : म्हाडा कॉलनीत वरिष्ठ लिपिकाची आत्महत्या, पुण्यात खळबळ

Shocking : धक्कादायक! लिफ्ट दिली अन् कैद केलं, विद्यार्थिनीवर ४ दिवस सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT