Majhi Tujhi Reshimgath Saam Tv
मनोरंजन बातम्या

Majhi Tujhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' घेणार चाहत्यांचा निरोप?, येणार 'ही' नवी मालिका...

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक काळ निखळ मनोरंजन केले.

Chetan Bodke

Majhi Tujhi Reshimgath: झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे, 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक काळ निखळ मनोरंजन केले. या मालिकेतही अनेक चढ उतार प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेऐवजी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेऐवजी आता प्रेक्षकांच्या भेटीला '३६ गुणी जोडी' ही मालिका येण्याची शक्यता आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टेलिव्हिजन सेटवरील लोकप्रिय मालिका म्हणून प्रेक्षकांच्या पसंदीस उतरली होती. नुकताच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोनुसार, ही मालिका २३ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ६:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या नव्या मालिकेमुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत.

या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, "36 गुण जुळले की जोडी जमते पण 36 चा आकडा असणाऱ्या जोडीचं काय करायचं" असा आशय लिहित मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. मालिका बंद होणार असल्याने चाहते बरेच नाराज झाले आहेत. चाहत्यांनी मालिकेच्या निर्मात्यांना मालिका बंद न करण्याची विनंती ही केली आहे.

चाहत्यांच्या मते, 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका पुन्हा जुन्या वेळेत म्हणजेच 8:30 वाजता सुरु करा. चाहत्यांच्या आवडती मालिका, 'माझी तुझी रेशीमगाठ' प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा सवाल प्रत्येकालाच पडला आहे.'३६ गुणी जोडी' ही मालिका येत्या 23 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मुख्य भूमिकेत अभिनेता आयुष्य संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरवटे आहे. अभिनेता आयुष्य 'बॉस माझी लाडाची' सोनी मराठीवरील मालिकेत दिसला होता तर अनुष्का सरवटे हिने 'कारभारी लयभारी' या मालिकेत भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan : आमिर खानचे विवाहबाह्य संबंध; लग्न न करता मुलगा, भावाच्या आरोपाने खळबळ, कोण आहे जेसिका हाइन्स?

मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण

Mumbai Rain Video : पावसामुळे मुंबईची तुंबई! गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांची ताराबंळ, व्हिडिओ पाहा

Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

SCROLL FOR NEXT