Farah Khanm and Shirish Kundra Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

फराह खाननं तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, पहिल्या वर्षीच...

फराह खान नुकतीच 'स्वयंवर: मिका दी वोटी'च्या सेटवर गेली होती. तिथे फराहने शिरीष कुंद्रासोबतच्या वैवाहिक जीवनाविषयीचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फराह खान(Farah Khan) ही बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माती आहे. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोची जजही राहिली आहे. फराह कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी लोकप्रिय नाही. फराह खान आणि फिल्म एडिटर शिरीष कुंद्रा यांनी २००४ मध्ये प्रेमविवाह केला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात खूप धमाल केली होती. परंतु गायक मिका सिंगच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी'या शोच्या सेटवर फराहला तिच्या लग्नाचे दिवस आठवले. तेव्हा फराहने धक्कादायक खुलासा केला. लग्नाच्या पहिल्याच वर्षी तिला घरातून पळून जायचे होते, असे ती म्हणाली.

फराह खान तिच्या विनोदी स्वभावामुळे खूप प्रसिद्ध आहे. ती कोठेही जाऊ दे, काही ना काही विनोद करून सगळ्यांना हसवतच असते. 'स्वयंवर'च्या सेटवर आलेल्या फराह खानने मिका सिंगसोबत लग्न करण्यासाठी आलेल्या स्पर्धकांशी खूप गप्पा मारल्या. यावेळी फराहने स्पर्धकांच्या अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली.

फराह खान आणि शिरीष कुंद्रा यांच्या अफेअरबद्दल कोणालाही माहिती नव्हती. फराहने लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 'मैं हूं ना' चित्रपटादरम्यान शिरीष कुंद्राने फराह खानला प्रपोज केला होता. फराहचा हा पहिला चित्रपट होता. ज्याच्या एडिटिंगसाठी शिरीषने खूप कमी पैसे घेतले होते. शाहरुख खानची पत्नी गौरी खानला पहिल्यांदा फराह आणि शिरीषच्या अफेअरची माहिती 'मैं हूं ना' या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये मिळाली होती. फराह खान ही आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT